

प्रतिनिधी वर्धा
दिनांक 16 मे 2025
**जि.पी.बाँईज फाऊंडेशन तर्फे वृध्दाआश्रम मधे फळ मिठाई वाटप व गुणवंत प्राप्त विद्यार्थांचा सत्कार सोहळा
स्थानिक पुलगांव येथे दि.१५/५/२५ गुरुवारी जि.पी.बाँईज फाऊंडेशन पुलगांव तर्फे सकाळी १० वाजता *शहाबानुबाई हिरानी वृध्दाआश्रम* पुलगांव येथे सर्व वृद्ध नागरिकांना फळ फ़्रूट मिठाई वाटप करुन उत्तम आरोग्य व ऊदंड निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
संध्याकाळी जि.पी.बाँईज फाऊंडेशन आँफिस प्रांगणात गुणवंत प्राप्त विध्यार्थी व पालकाचे सत्कार करण्यात आले.सर्व १० वी तील कु.सोनाली कुयटे,सक्षम बिरे, यथार्थ उमरे,आदित्य डाखोरे,कु.श्रेयशी मगर,कु.भावेरी गचके १२ वी तील कु.रुतुजा डोंगर, कु.जजा फातिमा बेग, वरील सर्व गुणवंत विध्यार्थी जि.पी.बाँईज फाऊंडेशन मधे संलग्नित असल्याने सत्कार करण्यात आले तसेच गुरुकुल अकँडमी चे शिक्षक अभिलाष दरवड़े सर व नवोदय परीक्षेचे मार्गदर्शक दिपक फुसाटे सर यांनी जे विध्यार्थी घड़विले त्या करीता त्यांचे पण स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे शेवटी मानवाधिकार आयोगचे वर्धा जिल्हा अध्यक्ष मा.इरफान बेग सर यांचा वाढदिवस केक कापून व पुष्पहार देवून सर्व उपस्थितानां मिष्ठान व शितपेय देवून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात जि.पी.बाँईज फाऊंडेशन चे संस्थापक गजुभाऊ पचारे, माजी नगराध्यक्ष मनिषकुमार साहु, निरज ढगे, प्रफुल्ल ढेपे सर,अनिल मगर,रविभाऊ साखरे,आनंद जिवने सर,अमित उमरे सर,सुशिल बांगर सर,डाखोरे सृजन कावळे,महेश दिघाड़े, निखिल आटे,प्रफुल्ल डोंगरे,प्रविण परसुळकर, सतिश पचारे,सतिश बिरे,सुनिल बिरे,प्रतिक जनबंधू , मयुर इंदुलकर, सुकलेश्वर कुयटे,प्रविण गाड़े,तुषारभाऊ वाघ , प्रियांशु साठे , चेतन भाऊ इत्यादी गणमान्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार तेजस ढोणे सर यांनी केले.
👏🏻🌹☘️💐🌻🌺😊




