
आर्वी तालुका प्रतिनिधी
नितीन आष्टीकर

दिनांक 9 डिसेंबर 2025 —
आर्वी, रोहणा, पुलगाव या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला झुकलेल्या काटेरी झाडामळे वाहतूकीला जीवघेणा त्रास होत असल्याचे अनेकांचे तोंडून किस्से ऐकण्यात आले रात्री 🌃 अपरात्री शेकडो वाहणे दुचाकीस्वार पुलगाव. रोहणा आर्वी मार्गाने ये जा करतात, अश्या मध्ये रोहणा ते बोरगाव पर्यंत अनेक बाभळीचे 🌲 झाडे रोडवर झुकले असल्याने समोरच्या वाहण्याच्या. लाईट च्या प्रकाशाने रस्ता मात्र दिसेनासा होतो अश्या वेळी दुचाकी चालकांना. या काटेरी झाडांमुळे. आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला कशी घ्यायची हा प्रश्न पडतो..? त्याच बरोबर दोन्ही बाजूची झाडें रस्त्यावर बहरल्यांने जंगली रानडुक्कर, कोल्हे, रोही, इत्यादी जंगली जनावरे रस्त्यावर येई पर्यंत दिसून येत नाही. त्यामुळे वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन या रस्त्याने दळणवळण करावे लागते तसेच
या झाडांमुळे भर दिवसा समोरुन येणारे वाहणे. सुध्दा निदर्शनास येत नाही. कित्येक दुचाकीस्वारांना रस्त्याच्या बाजुवरुन जाताना जबर फटके बसतात त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन मोठ मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, समोरील मोठ्या वाहणाने साईड दिल्या मुळे आज सावंगी पोड मौजात. भर दुपारी एका दुचाकी चालकाची गाडी पुलावरून जात असताना सरळ बाभळीच्या झाडाच्या बाहुपाशात जावुन अडकली कांहीं ग्रामस्थांच्या मदतीने त्याला त्या झाडातून बाहेर काढण्यात आले. आर्वी पुलगाव रोडवर मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या वाहतूकीत वाढ झाली असून रस्त्याने वाहन चालवताना मोठ्या जोखमीने चालवावे लागते, कारण दरमहा कित्येक किरकोळ तसेच जीवघेणी अपघात या मार्गावर होत असतात त्यामुळे रस्ते बांधकाम विभाग आर्वी यांनी या गंभीर समस्येकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे. या व्रुत्ताची दखल घेऊन एका सप्ताह मध्ये रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा या गंभीर विषयावरून “बंजारा गोरसेना” वर्धा जिल्हाध्यक्ष नानाभाऊ राठोड हे या मार्गांवर मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.




