HomeUncategorizedअल्फोंसा सिनीयर सेकंडरी स्कूलच्या भुषन रवी चतुरकर यांची भारतीय वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर...

अल्फोंसा सिनीयर सेकंडरी स्कूलच्या भुषन रवी चतुरकर यांची भारतीय वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड…!!

प्रतिनिधी वर्धा

दिनांक 18 डिसेंबर 2025
अल्फोन्सा एज्युकेशन सोसायटीच्या उप व्यवस्थापकीय अधिकारी सिस्टर रोझांटो व्यवस्थापिका सिस्टर पॉनसी तसेच प्राचार्य सिस्टर नव्या उपप्राचार्य सिस्टर हर्षिता यांच्या हस्ते भूषणला शाळेच्या परिसरात बोलावून गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक व विद्यार्थी यांनी भूषणचे कौतुक करत त्याला पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.
भूषण याने आपल्या शाळेतील अनुभव तसेच आपल्या आयुष्यात अनुभवले अनुभव सर्व विद्यार्थ्यांमध्ये सांगत विद्यार्थ्यांमध्ये उत्तेजना निर्माण केली. भूषण याने विमान आणि रॉकेट तंत्रज्ञानात स्पष्ट रस असल्याने बारावी पूर्ण केल्यानंतर लगेचच एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये बी.टेक केले.
अंतिम वर्षात भूषणची सशस्त्र दलात सामील होण्याची आवड जोपासली. AFCAT परीक्षेला बसलो, सर्व टप्पे यशस्वीरित्या उत्तीर्ण करत वाराणसी हवाई दल निवड मंडळाने भूषणची शिफारस केली.
भूषण हा भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून काम करणार आहे. भूषण हा कुटुंबातील पहिला वर्ग-एक राजपत्रित अधिकारी असल्याचा अभिमान आहे
भूषण याने आपल्या यशाचे श्रेय आपल्या शाळेला तसेच आपल्या आई-वडिलांना दिले.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
30.6 ° C
30.6 °
30.6 °
11 %
4.6kmh
0 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
32 °

Most Popular