HomeUncategorizedधामणगाव ते तळणी रेल्वे मार्गावर एक व्रुद्ध इसमाची रेल्वेने कटुन आत्महत्या -:...

धामणगाव ते तळणी रेल्वे मार्गावर एक व्रुद्ध इसमाची रेल्वेने कटुन आत्महत्या -: मंगरूळ, दस्त पोलीस ठाणे हद्दीतील घटना..!!

प्रतिनिधी अमरावती

दि 11/ जानेवारी /2026

प्रशांत ज्ञानेश्वर दाभेकर यांनी दिलेल्या पोलीस स्टेशन रिपोर्ट वरून

मी ओकनाथ येथे राहतो, तसेच नमुद पत्यावर आई वडील तसेच पत्नी व मुला बाळा सह राहतो. माझा मोठा भाउ नामे हरीष ज्ञानेश्वर दाभेकर हा त्याचे परीवारा सह नागपुर येथे राहतो. माझे वडील मृतक नामे ज्ञानेश्वर मारोतराव दाभेकर वय 75 वर्ष रा वकनाथ यांचे अंदाजे एक वर्षा पुर्वि उजव्या डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. परंतु ऑपरेशन नंतर त्यांना डोळयाचा त्रास होता. त्यामुळे ते नेहमी अस्वस्त राहुन चिडचिड करत होते.

आज दि.09/01/2026 रोजी सकाळी 07.00 वा मी पुलगाव येथे मजुरीचे कामाला जाते वेळी माझे वडील मला भेटले व मला मी धामनगाव रेल्वे येथे निराधाराचे पगारासाठी जातो. असे म्हटले त्यानंतर मी पुलगाव येथे कामाला गेलो. त्यानंतर सायंकाळी 08/00 वा दरम्यान मी व माझा चुलत भाउ घनश्याम कवडुजी दाभेकर वय 34 वर्ष रा वकनाथ असे घरी आलो तेव्हा मला माझे आई नामे कुंदा उर्फ मंदाबाई ज्ञानेश्वरराव दाभेकर यांनी सांगीतले की, तुझे वडील हे 04/00 वाजता घरी आले व त्या नंतर ते बाहेर गेले व ते अजुन पर्यत घरी परत आले नाही. असे समजल्या वरुन मी व माझा चुलत भाउ घनश्याम असे वडीलाचा गावात शोध घेत असता गावातील लोकांकडुन समजले की माझे वडील हे स्मशान भुमी कडे जातांना दिसले म्हणुन आम्ही स्मशान भुमीच्या रस्ताने जावुन पाहीले तर स्मशान भुमीला लागुन असलेल्या रेल्वे पटरीवर माझे वडील हे रेल्वे पटरीवर मृत आवस्तेत पडलेले दिसले त्यांचे कपडयावरुन त्यांची ओळख पटली व त्यानंतर मी गावचे पोलीस पाटील प्रतिक्षा मीलींद कांबळे रा वोकनाथ यांना माहीती दिलेल्या माहिती वरून

माझे वडील नामे ज्ञानेश्वरराव मारोतराव दाभेकर वय 75 वर्ष रा वकनाध हे मागील काही दिवसा पुर्वी डोळयाचे ऑपरेशन झाले होते. तरी सुध्दा त्यांना डोळ्याचा त्रास होता त्या मुळे ते अस्वस्थ राहुन घरात चिडचिड करायचे त्या त्रासाला कंटाळुन त्यांनी रेल्वे पटरीवर जावुन आत्महत्या केली असल्याची जबानी बयानात पोलीसांना माहीती दिली.

सदर घटनेची मंगरूळ दस्त पोलीस ठाणे तसेच धामणगाव रेल्वे थाना येथे आत्महत्या प्रकरणाची नोंद करण्यात आली.

RELATED ARTICLES
Jharkhand
few clouds
33.9 ° C
33.9 °
33.9 °
19 %
4.3kmh
22 %
Sat
32 °
Sun
36 °
Mon
40 °
Tue
38 °
Wed
39 °

Most Popular