HomeUncategorizedआर्वी विधानसभा क्षेत्रात मला शंभर कार्यकर्ते आर्थिक द्रुष्ट्या सक्षम बनवायचे आहे -...

आर्वी विधानसभा क्षेत्रात मला शंभर कार्यकर्ते आर्थिक द्रुष्ट्या सक्षम बनवायचे आहे – अनंतभाऊ मोहोड…!!

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0003,0.0000; brp_del_sen:0.1300,0.0000; motionR: 0; delta:null; bokeh:0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 270.11792;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 35;

आर्वी विधानसभा क्षेत्रात मला शंभर कार्यकर्ते आर्थिक द्रुष्ट्या सक्षम बनवायचे आहे – अनंत मोहोड

प्रतिनिधी आष्टी

आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी, आष्टी तालुका अंतोरा, माणिकगड येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताह च्या निमित्ताने आयोजित आर्वी विधानसभा क्षेत्रातील काॅग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला,
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या नवीन अंतोरा येथील माणिकगडावर दिनांक १२ जानेवारी २०२६ पासून सुरु झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त
आयोजित आज दिनांक १९ जानेवारी रोजी, माणिकगडावर हजारोंच्या संख्येने जनसमुदायउपस्थित होता,

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0168,0.0000; brp_del_sen:0.1300,0.0000; motionR: 0; delta:null; bokeh:0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 142.92429;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 35;

आजच्या या पुण्यतिथी सप्ताह च्या समारोप प्रसंगी काॅग्रेस पक्षाचे मोठ, मोठे दिग्गज नेते यांनी हजेरी लावली होती, ज्या मध्ये महाराष्ट्राचे माजी उच्चं तंत्र शिक्षण मंत्री वसंत पुरके, आजचे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लोकप्रिय व्रुत्तपत्र, दैनिक देशोन्नती चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार अभीजीत वंजारी, जेष्ठ पत्रकार प्रकाश कथले, इत्यादी मान्यवर तसेच वर्धा जिल्हा उपाध्यक्ष. चंद्रशेखर जोरे, आर्वी तालुका ब्लॉक कमेटी अध्यक्ष चंद्रशेखर वनस्कर, आर्वी शहर अध्यक्ष सुधाकर भुयार, वर्धा नालवाडी ग्रामपंचायत चे सरपंच बाळा माऊसकर, व शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुरुवातीला सर्व प्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पालखी चे दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवर तथा पाहुण्यांचा अनंत मोहोड यांनी स्वहस्ते यथोचित. सन्मान सत्कार केला.
बाबुजी दादा मोहोड ज्यांच्या कर्तृत्वाने आज आर्वी विधानसभा क्षेत्रातील माणिकगढ हे स्थान सर्व सामान्य जनतेचे आदर्श तसेच विशेष पर्यटन स्थान बनले, त्याबद्दल हजारो लोकांनी बाबुजी मोहोड यांचे स्मरण करून आज त्यांना आदरांजली वाहीली.
पंचक्रोशीतील एक दानी व्यक्तीमत्व म्हणून ज्यांची ख्याती होती, असे महान व्यक्तीमत्व बाबुजी मोहोड यांची माणिकगडावर आल्यावर आठवण झाल्या शिवाय राहत नाही,
आज त्यांचे सुपुत्र आपल्या विधानसभा क्षेत्रातील जनसामान्यांच्या विकासाच्या उदात्त हेतूने वडीलांच्या पावलावर पाय ठेवत गोरगरिबांची सेवा करायला निघालेत, आगामी येणाऱ्या झेडपी पंचायत. जिल्हा परिषद समीतीच्या निवडणुकीच्या नियोजना बद्दल विशेष कार्यकर्ता मेळावा माणीकगडावर आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते,
कि मला शभर कार्यकर्ते आर्थिक द्रुष्टया सक्षम बनवायचे आहे, ज्या मधून काही आमदार किंवा खासदार अथवा कोणत्याही पदावर राहून जनतेची सेवा करेल हाच माझा मानस आहे, या यशस्वी पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उत्सव समीतीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, यावेळी
हजारो राष्ट्रसंत गुरुभक्तानी मनसोक्त, मनमुरादपने, उत्साहपूर्ण वातावरणात महाकाल्याचा आस्वाद घेतला, यावेळी संपुर्ण अंतोरा माणिकगडावर सर्वत्र वंदनीय राष्ट्रसंत
विचार धारेच्या हजोरो भक्तांचा सहभाग
लाभला होता, त्यामुळेच हा पुण्यतिथी सप्ताह खर्या अर्थाने यशस्वी झाला.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0012,0.0000; brp_del_sen:0.1000,0.0000; motionR: 0; delta:null; bokeh:0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 134.7617;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 35;
RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
25.8 ° C
25.8 °
25.8 °
17 %
2.5kmh
0 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
32 °

Most Popular