HomeUncategorizedवर्धा रामनगर पोलीसांची प्रशंसनीय कारवाई,, आठ दिवसात चोरी गेलेला दहाचाकी ट्रकचा मध्य...

वर्धा रामनगर पोलीसांची प्रशंसनीय कारवाई,, आठ दिवसात चोरी गेलेला दहाचाकी ट्रकचा मध्य प्रदेशात लावला शोध…!!

प्रतिनीधी वर्धा

पोलीस स्टेशन रामनगर येथे दिनांक १३ जानेवारी 2026 रोजी तकारकर्ता किशोर पांढुरग उरकुडे राहणार. तडस लेआउट ग्रामपंचायत जवळ पिपरी मेघे वर्धा. यांचा मालकीचा ट्रक क्रमांक. एम एच-३२ ए जे ६३६६ हा १० चाकी ट्रक वाहन किंमत 40 लाख /- रू हा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तकार दिल्यावरून रामनगर पोलीस ला अपराध क्रमांक. 44/2026 कलम ३०३(२) बि एन एस प्रमाणे गुन्हा नोंद करून तात्काळ तपासात घेवुन तपास सुरू केला.

सदरहु गुन्हयांचे तपासात यातील फिर्यादीचा नेलेला १० चाकी ट्रक हा कोणी अज्ञांताने चोरून नेला असल्याने कोणताही संशयती पुरावे/ठसे/निशानी नसतांना रामनगर पोलीस स्टेशन चे अधिनस्त असलेले पोलीस पथक व आरोपी शोध पथकांना पाचारण करून लागलीच त्या दिवशीच मिळालेल्या माहीतीच्या मार्गाने रवाना केले़ सतत ९ दिवस आरोपीचा शोध पथकांनी कसोशीने प्रयत्न करीत व जिवपाड अथक प्रयत्न करीत माहीती तंत्रज्ञांनाचा उपयोग करीत व गुप्त माहीती सुत्रधार व्यक्तीना कार्यान्वीत करून मिळेल त्या माहीतीच्या तपास करीत चोरी गेलेला टक चा मागोवा घेतला. तसेच राज्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्स्थान या मार्गावरील एकुण ३० टोल नाके व अंदाजे ३०० सिसिटीव्ही फुटेज चेक करून, बारकाईने अवलोकन करीत वर नमुद या राज्यात शोध सुरु असताना शेवटी सदरहु ट्रक हा मध्यप्रदेश राज्यातील अतिदृग्रम भाग असलेला अलीयापुर जिल्हा, पोलीस.स्टेशन. भाबरा (तहसील आझाद चंद्रशेखर नगर) ग्राम बोरकरा येथे असल्याची माहीती मिळाताच लागलीच पोलीस स्टॉप यांनी स्थळ गाठुन शोध घेतला असता, अज्ञात आरोपीस पोलीस मागावर असल्याची चाहूल लागतच ट्रक सोडुन तो पसार झाला. व सदरहु ट्रकची मुळ स्थिती अज्ञात आरोपीने बबदल्याने ते माहीती घेत व बारकाईने तपासणी करीत चोरीच्या गुन्हयांतील ट्रक हाच असल्याची खात्री पटल्यावर सदर ट्रक चोरीचा गुन्हा रामनगर वर्धा पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे

सदरहु गुन्हयांतील ट्रक चोरीबाबत कोणताही सुगावा नसतांना, अधिनस्त पथकातील सपोनि/अंबादास टोपले, पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख, पो.उप निरिनक्षक दिनेश कांबळे, पोलीस अमलदार गजानन मस्के, पोलीस शिपाई प्रशाद शिंदे, विशाल देवकाते, पथकातील पोलीस हवालदार योगेश चन्ने, पोलीस शिपाई राहुल भोयर, पोलीस शिपाई रूपेश उगेमुगे, पोलीस शिपाई सचीन पवार, तसेच पथकांतील पोलीस हवालदार अविनाश बन्सोड, पोलीस शिपाई मुकेश वांदीले, पोलीस शिपा विक्की अनेराव, पोलीस शिपाई/मनोज भोमले व स्थानीक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकुर, पोलीस हवालदार नरेन्द्र पाराशर, पोलीस हवालदार संजय राठोड, दिपक साठे, मिथुन जिजकार व यातील खात्रीकरित्या माहीती देणारे सायबर सेलचे पोलीस अमलदार गोविदराव मुढें, व अक्षय राउत यांनी महत्वाची भुमीका बजावत सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

सदरहु गुन्हयांचा तपास हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रमोद मकेश्वर स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी पोलीस.स्टेशन रामनगरचे ठाणेदार अजय भुसारी वर्धा यांचे मार्गदर्शनात तपास करून गुन्हयांतील चोरी गेलेल्या ट्रकचा शोध घेवुन हस्तगत करण्यांत आला आहे. सदर गुन्हयांतील पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक दिनेश कांबळे व त्यांचे सहकारी पथक करीत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
25.8 ° C
25.8 °
25.8 °
17 %
2.5kmh
0 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
32 °

Most Popular