आर्वी तालुका प्रतिनिधी
नितीन आष्टीकर
आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी महात्मा गांधी चौकातील जय स्तंभाला
शहीद विरांंच्या स्म्रुती बद्दल पुष्प चक्र वाहून दिली आदरांजली.

यावेळी आर्वीत
विविध सामाजिक संघटने कडून 14 फरवरी 2026 रोज शनिवारला पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना गांधी चौक येथील जयस्तंभाला पुष्प चक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. आमदार श्री दादारावजी केचे विधान परिषद तसेच अध्यक्ष लखन अग्रवाल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक होते .कार्यक्रमाचे संचालन दर्पण टोकसे यांनी केले तर आभार गुड्डू पठाण यांनी मानले .कार्यक्रमात श्रद्धांजली वाहताना भारत माता की जय, वंदे मातरम चे नारे लावण्यात आले. कश्मीर येथील पुलवामा येथे आतंकवादी यांच्या कायरता पूर्ण हल्ल्यात भारत मातेचे 40 सैनिक शहीद झाले होते. या भ्याळ हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहताना प्रथम राष्ट्रगीत म्हणून दोन मिनिटं मौन ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात आर्वी शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने राजेश शिरगरे, रवींद्र खंडारे ,प्रशांत हेरोडे ,राहुल काळे, पांडुरंग मलिये, शैलेश तलवारे, सूर्यप्रकाश भट्टड , नितीन आष्टीकर, गोपाल मरसकोल्हे ,शिरीष काळे ,शोभाताई कानफाडे ,प्रभाकर निंबाळकर, अजय निंबाळकर ,प्रमोद एडाखे, तौशिफ रजा, दशरथ जाधव ,अनिरुद्ध देशपांडे विनोद बावने आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.




