HomeUncategorizedमोपेड दुचाकी चोरट्याला मोठ्या शिताफीने केली आर्वी पोलिसांनी अटक...!!

मोपेड दुचाकी चोरट्याला मोठ्या शिताफीने केली आर्वी पोलिसांनी अटक…!!

आर्वी पोलीस ठाणे हद्दीतील घटना

प्रतिनिधी आर्वी

दिनांक 19 फेब्रुवारी 2026

अपराध कमांक
४०/२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहीता

फिर्यादी संदिप प्रल्हाद दुधानी वय ३९ वर्ष रा. गांधी चौक आर्वी तर या चोरीच्या घटनेतील आरोपी नामे मनोज दुर्योधन गोंडाणे वय ३९ वर्ष रा. स्टेशन वार्ड हमालपुरा आर्वी जिल्हा वर्धा

४०/२६ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहीता
जप्त मुद्देमाल
एक जुनी वापरती होन्डा कंपनीची अॅक्टीवा मोपेड गाडी क्रमांक एम.एच. ३२ ए.सी. ०८३६ चेचीस क. ME4JF504FFT444996

इंजीन क JF50ET2446052 किमत ३५,०००/- .

गुन्हयाची थोडक्यात हकीकत यांप्रमाणे आहे की, फिर्यादी हे दिनांक १२.०१.२०२६ रोजी सकाळी ०९.३० वा. चे सुमारास सिंधी कॅम्प येथुन गाडीने पाणी घेवुन येवुन त्यांची होन्डा कंपनीची अॅक्टीवा मोपेड गाडी क्रमांक एम.एच. ३२ ए.सी. ०८३६ ही गांधी चौक येथिल त्यांचे घरासमोर उभी करून घरात गेले व आंघोळ करून दुकानात जाण्याकरीता गाडी जवळ आले असता घरासमोर उभी करून ठेवलेली गाडी दिसली नाही. शोध घेतला असता मिळुन आली नाही. अशी फिर्यादीची होन्डा कंपनीची अॅक्टीवा मोपेड गाडी क्रमांक एम.एच. ३२ ए.सी. ०८३६ ही कोणीतरी अज्ञात चारेटयाने चोरून नेल्याचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन आर्वी येथे अपराध क्र. ४०/२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा नोंद आहे.

सदर गुन्हा तपासावर असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली की, एक पांढऱ्या रंगाचे व ग्रे काळया रंगाचे चेकचे शर्ट व काळया रंगाचा पॅन्ट घातलेला ईसम एक पांढऱ्या रंगाची मोपेड गाडी विना कागदपत्रे असलेली संशईत रीत्या स्टेशन वार्ड आर्वी येथिल रेल्वे स्टेशन जवळ विक्री करण्याकरीता फिरत असुन ग्राहक पाहात आहे, सदरच्या माहीती वरून पंच व पोस्टाफ पोहवा दिगांबर रूईकर/१२६७, पोशि सुरजसिंग बावरी /८८६, सैनिक अंकुश दरोई/१२५० असे खाजगी वाहनाने ठाणेदार सा. यांना माहीती देवुन त्यांचे आदेशान्वये रेल्वे स्टेशन परीसर आवी येथे पोहचुन सदर ईसमाचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने नमुद ईसम यास पंचांचा पोलीस परिचय देवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांने आपले नाव मनोज दुर्योधन गोंडाने वय ३९ वर्ष रा. हमालपुरा स्टेशन वार्ड, आर्वी असे सांगीतले त्याग त्याचे ताब्यातील विना क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मोपेड गाडीचे कागदपत्राबाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. आम्ही पंचा समक्ष विना क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मोपेड गाडीची पाहाणी केली असता गाडीला नंबर प्लेट दिसुन आली नाही वरुन आम्ही गाडीच्या चेचिस क्र. चेचीस क. ME4JF504FFT444996 इंजीन क JF50ET2446052 असा दिसुन आला वरुन आम्ही पंचा समक्ष नमुद आरोपीस विश्वासात घेवुन त्यास विचारपुस केली असता त्याने सदरची गाडी ही गांधी चौक आर्वी येथुन अंदाजे १ महिण्यापुर्वी चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्हयात चोरीस गेलेली होंडा कंपनीची अॅक्टीवा मोपेड गाडी क्र. एम.एच. ३२ ए.सि. ए.सी. ०८३६ ही जप्ती पंचानामा कार्यवाही प्रमाणे जप्त गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कार्यवाही मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक साहेब, वर्धा, मा. श्री सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा आणि मा. श्री चंद्रशेखर ढोले उपविभागीय पोलीस अधीकारी, आर्वी यांचे निर्देशाप्रमाणे श्री सतिष डेहनकर पोलीस निरीक्षक, पो.स्टे. आर्वी यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पो. हवा. दिगांबर रुईकर, अमर हजारे, ब.नं. १२४६, पो.अ सुरजसिंग बावरी /८८६, रोशन टेंभरे ब.नं. ५३६ व सैनिक अंकुश दरोई/१२५० यांनी केली.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.1 ° C
22.1 °
22.1 °
63 %
1.6kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular