HomeUncategorizedमानवी जीवनात पुनर्जन्मासाठी सत्कार्याची जोड हवी... पुनर्जन्मी सुनिता देवी...!!

मानवी जीवनात पुनर्जन्मासाठी सत्कार्याची जोड हवी… पुनर्जन्मी सुनिता देवी…!!

कारंजा तालुका प्रतिनिधी

सतीश तागङे

दिनांक 25 फेब्रुवारी 2026
~~~

         पृथ्वीवर जन्म घेणारे सर्वच प्राणी हे पूर्वजन्माच्या बऱ्या वाईट कार्यामुळे व आपल्या अंतिम वासने नुसार जन्म घेतात . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात- 

” वासने तुज भोवती , किती जन्म घालावे अम्ही ?”
कुणी बदल्यासाठी तर कुणी उपकाराची परतफेड करण्यासाठी जन्म घेतात पण चांगला जन्म हवा असेल तर मानवाला पुनर्जन्मासाठी सत्कार्याची जोड असणे महत्त्वाचे आहे. असे बेलगावच्या महाशिवरात्री महोत्सवात पुनर्जन्मी सुनीतादेवी यांनी आपल्या प्रगट मुलाखती द्वारे विचार व्यक्त केले.
पुनर्जन्माची पार्श्वभूमी लाभलेल्या सुनीतादेवी च्या निमित्ताने आदिवासींच्या बेलगाव (कारंजा. घा.) वर्धा येथे अमेरिकेच्या व्हर्जिनिया विद्यापीठाचे शास्त्रज्ञ ईवान स्टीव्हंसन सारख्या शास्त्रज्ञांनी तसेच फ्रान्स ,जर्मनीच्या संशोधकांनी प्रत्यक्ष येऊन पुनर्जन्मा संबंधी सर्व पुराव्यासह पुनर्जन्मी सुनीतादेवीच्या प्रकरणी संशोधन सिद्ध केले.
दरवर्षी येथे हजारो संशोधक,पत्रकार,विद्यार्थी,अध्यात्मिक अभ्यासक महाशिवरात्री सोहळ्यात सुनितादेवीची प्रगट मुलाखत ऐकण्यासाठी महाराष्ट्रासह इतर प्रांतातून मोठ्या संख्येने येतात.
बेलगाव हे आदिवासींचे गाव असले तरी येथे कसलेही अंधश्रद्धेचे किंवा बुवाबाजीचे थोतांड नसून पुनर्जन्मी सुनीतादेवी मुळे आदिवासींच्या जीवनात प्रगतीची सोनेरी पहाट उगवली आहे. यावर्षी या महोत्सवात खा. अमरभाऊ काळे ,विधान परिषद आ. दादारावजी केचे ,राष्ट्रीय वक्ते ॲड. दिलीप कोहळे यांचे मार्गदर्शन लाभले .पुनर्जन्मी सुनीतादेवी विनोदजी टावरी यांच्या प्रगट मुलाखतीतून पूर्वजन्मीच्या आठवणींना उजाळा मिळाला .प्रास्ताविक रमेशचंद्र सरोदे यांनी केले. गोपालकाल्याचे किर्तन ह.भ.प. रामकृष्ण महाराज आत्राम यांनी, संचालन कु.साक्षी सोनारे ,मीनाताई धुर्वे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक धुर्वे यांनी केले .
याप्रसंगी माजी सभापती वर्धा नीताताई गजाम ,माजी जि.प.अध्यक्ष सरिताताई गाखरे,चेतनाताई मानमोडे, टिकाराम घागरे, टिकाराम चौधरी, शरद ढोबाळे, रमेशचंद्र सरोदे, विनोदजी टावरी, नरेंद्रजी वाघ, काशिनाथजी गोंधळे, प्रमोदजी बुरंगे, गोदावरी आत्राम ,सरपंच स्वप्निल खवशी, ॲड.आश्विनी कोहळे,कृष्णाभाऊ हरले यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी सुनीतादेवीचे पूर्वजन्मीचे बंधू शेषरावजी काळमेघ तसेच प्रमोदजी बुरंगे यांचा सत्कार करण्यात आला. या महाशिवरात्री महोत्सवात ह .भ. प.युवराज महाराज वर्धा यांनी शिवमहापुराण सादर केले तर पोवाडा गायन प्रमोद गायकवाड यांनी तसेच रवी लाड ,बंटी कोटे, विजय कटरे,लीलाधर चोपडे यांनी संगीत साथ संगत केली. राष्ट्रवंदनेने व महाप्रसाद भंडाराने महोत्सवाची सांगता झाली. ‌

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
28.6 ° C
28.6 °
28.6 °
15 %
2.5kmh
0 %
Thu
28 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
38 °
Mon
40 °

Most Popular