HomeUncategorizedरसुलाबाद येथे कापुस उत्पादक शेतकरी मेळावा कार्यक्रम संपन्न.

रसुलाबाद येथे कापुस उत्पादक शेतकरी मेळावा कार्यक्रम संपन्न.

रसुलाबाद येथे कापूस उत्पादक शेतकरी मेळावा कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी आर्वी
दिनांक 25 फेब्रुवारी 2026

रसुलाबादः भारतीय कृषी अनुसंधान परिषद केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर तर्फे राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व्यापारी पिके अंतर्गत कीटक प्रतिकारक क्षमता व्यवस्थापनः गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन रणनीतींचा प्रसार शेतकरी मेळावाचे आयोजन रसुलाबाद येथे नुकतेच करण्यात आले होते. डॉ. व्ही. एस. नगरारे प्रमुख शास्त्रज्ञ (कीटकशास्त्र) आणि समन्वयक (आय. आर. एम. पी.बी. डब्लू. प्रकल्प) केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजेश सावरकर (माजी सरपंच रसुलाबाद), श्री. विजय खोड़े मंडल कृषि अधिकारी, श्री. दिनेश सवले उपकृषि अधिकारी आर्वी, डॉ. बाबासाहेब फंड वरिष्ठ शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, श्री. राजेंद्र मानकर प्रगतशील शेतकरी, शेतकरी. श्री. शुभम कदम (पी. आय. प्रतिनिधि) आदी उपस्थित होते. आय.आर.एम. पी.बी.डब्लू. प्रकल्पाचे वर्धा जिल्हा समन्वयक डॉ. शैलेश गावंडे (वरिष्ठ शास्त्रज्ञ, वनस्पती रोगशास्त्र) आणि डॉ. रचना पांडे (वरिष्ठ शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र) तसेच आशुतोष चिंचोळकर, (वरिष्ठ संशोधक सहकारी) आणि मोहित पेशकार यग प्रो. १ यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. सहायक कृषी अधिकारी रसुलाबाद श्री. निलेश गंधे, अक्षय बिजवे, संदीप रघाटाटे यांचे आयोजनात सहकार्य लाभले. यावेळी उद्घाटनपर भाषणात डॉ. नगरारे यांनी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तसेच प्रकल्पाची उद्दिष्टे शेतकऱ्यांसमोर विषद केली व हा प्रकल्प कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी कसा महत्वचा आहे हे पटवून दिले. डॉ. रचना पांडे यांनी पी बी नॉट तसेच गुलाबी बोंडअळीसाठी उपलब्ध व्यवस्थापन पद्धती तसेच बोंडसड व्यवस्थापन याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. श्री. विजय खोड़े यांनी महिविस्तार ऐ. आय अॅप्स बाबत सविस्तर माहिती दिली. श्री. दिनेश सवले यांनी कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाबाबत मार्गदर्शन केले. निलेश गंधे यांनी नानाजी देशमुख प्रकल्प विषयी माहिती दिली. त्यानंतर डॉ. शैलेश गावंडे यांनी सर्व मान्यवरांचे व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले तसेच डॉ. बाबासाहेब फंड यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
Jharkhand
few clouds
35.7 ° C
35.7 °
35.7 °
14 %
3.1kmh
11 %
Fri
37 °
Sat
35 °
Sun
38 °
Mon
40 °
Tue
38 °

Most Popular