HomeUncategorizedजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नेरी (मिर्झापुर) येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नेरी (मिर्झापुर) येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न…!!

प्रतिनिधी आर्वी


आज दिनांक 11 मार्च रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नेरी (मिर्झापुर) येथे
पहीली ते चौथी, तसेच पाचवी ते सातवी या दोन गटात सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा सन 2025 – 26 राबविण्यात आली होती.
शाळा व्यवस्थापणाच्या संकल्पनेतून मुख्याध्यापक मंगेश कोल्हे सर तसेच सहाय्यक शिक्षक विवेक कहारे, तसेच पल्लवी वाकेकर मॅडम यांच्या अथक प्रयत्नांने विद्यार्थी मुला – मुली मध्ये भविष्यात त्यांना जनरल नॉलेज जास्तीत जास्त अवगत व्हावे करीता पहील्यांदाच अश्या स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आले होते.
ज्यामध्ये विध्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीने अभ्यास पुर्ण व्हाट्सअप मोबाईल वरील पीडीएफ प्रश्नोत्तरे वाचून त्याचे अचूक उत्तरे लिहून आपल्या प्रतीभेचा परिचय दिला.
लहानपणापासून विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान प्राप्त होण्यासाठी आज विवेक कहारे यांनी शाळेतील विद्यार्थ्यासाठी
शालेय बचत बँक ची अभिनव कल्पना साक्षात उतरविली ज्यामध्ये आजच सर्व विद्यार्थी मुला मुलींना त्यांच्या बँक पासबुक चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सामान्य ज्ञान परिक्षेत प्रथम क्रमांकाने
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
ज्या मध्ये वर्ग पहीलीतून नव्या स्वप्नील वाटकर, तर दुसऱ्या वर्गातून
उन्नत अशोक सोनटक्के,
वर्ग तिसरी मधून अथर्व प्रमोद दिघाडे,
वर्ग चौथा मधून स्वरा प्रशांत कडू, वर्ग पाचवीतून पूर्वी महेश सोनटक्के,
वर्ग सहावीतून दिव्यम प्रशांत कडू तर
वर्ग सातवी मधून
यश जगदीश कामडी या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे शिल्ड तसेच अन्य प्रोत्साहनपर बक्षिसे मिळवले.
तसेच सर्व सहभागी विद्यार्थी मुला मुलींना विवेक कहारे सर यांच्या कडून विशेष भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुहास ठाकरे उपस्थित होते, तर अध्यक्ष म्हणून पुरोगामी टिव्ही न्यूज संपादक विनय इंगळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य महेश कठाणे व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा कठाणे, प्रशांत कडु, स्वप्नील वाटकर, प्रमोद दिघाडे, आशा सेविका अनिता कांमडी तसेच विद्यार्थ्यांचे पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन तथा उत्कृष्ठ सुत्र संचालन कहारे सर तसेच आभार प्रदर्शन पल्लवी वाकेकर मॅडम
यांनी केले.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:0.0000,0.0000;
brp_del_sen:0.0000,0.0000;
motionR: 0;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 102.50552;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 46;
RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
26.4 ° C
26.4 °
26.4 °
27 %
1kmh
0 %
Thu
36 °
Fri
38 °
Sat
37 °
Sun
39 °
Mon
41 °

Most Popular