HomeUncategorizedआर्टी प्रशिक्षणासाठी 6200 विद्यार्थ्यांनी भरले अर्ज

आर्टी प्रशिक्षणासाठी 6200 विद्यार्थ्यांनी भरले अर्ज

आर्टी प्रशिक्षणासाठी ६२०० विद्यार्थ्यांनी भरले ऑनलाईन अर्ज…!
◼️◼️◼️◼️◼️◼️
१४० कोर्सेससाठी दिले जाणार विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात प्रशिक्षण…!
◼️◼️◼️◼️◼️◼️
✒️✒️रनबावळे एस.डी.
◼️◼️◼️◼️◼️◼️अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर्टी) वतीने अतीवंचित असणाऱ्या मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांच्या उन्नतीकरीता विविध कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षणासाठी ६२००
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाची नोंदणी केली असून १४० कोर्सेससाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात प्रशिक्षण दिले जाणार आहे.अशी माहिती (आर्टी) येथील कार्यालयात
संपर्क साधला असता तेथील अधिकारी यांनी दिली.

अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर्टी) वतीने विविध कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षणासाठी
आर्टीच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी दिनांक ३१/०१/२०२५
रोजी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले होते.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ होती.याकालावधीत

ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत आशा विद्यार्थ्यांच्या कौशल्य प्रशिक्षणानुसार आणि स्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षणा प्रमाणे त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून लवकरच ही प्रक्रिया
पूर्ण करण्यासाठी
ऑनलाईन अर्जात काही त्रुटी आढळल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांक आणि ई – -मेल च्या माध्यमातून संपर्क साधून उमेदवाराच्या त्रुटींची पूर्तता करून
घेतली जाईल.आणि
६२०० विद्यार्थ्यांना १४० कोर्सेससाठी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या सोईच्या शहरातील नजीकच्या स्थळावर प्रत्यक्षात संस्थेच्या अटी व शर्तीच्या निकषनुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा मध्ये एमपीएससी, युपीएससी,बॅंक (आयबीपीएस), रेल्वे, जेईई- नीट, युजीसी- नेट/ सेट, पोलीस/ मिलीटरी.
कौशल्य विकास प्रशिक्षणात परदेशात नोकरीसाठी लागणारे विविध कौशल्य प्रशिक्षण व परदेशी उच्च शिक्षणाची संधी, शेतीपुरक विविध व्यवसाय प्रशिक्षण, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, तसेच कम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भतील विविध कोर्सेसचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.आणि पीएच.डी,पोस्ट पीएच.डी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती दिली जाणार आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
27.8 ° C
27.8 °
27.8 °
65 %
2kmh
8 %
Fri
38 °
Sat
41 °
Sun
42 °
Mon
44 °
Tue
41 °

Most Popular