HomeUncategorizedआर्वि तालुक्यातील राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न...!!

आर्वि तालुक्यातील राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न…!!

प्रतिनिधी आर्वी

नितीन आष्टीकर

दिनांक 24 मे 2025

आर्वी तालुक्यातील आशीर्वाद मंगल कार्यालया मध्ये काँग्रेस पक्षाची संवाद व पक्ष संघटन बैठक वर्धा जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक माजी आमदार श्री. वीरेंद्र जी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व श्री अनंत बाबूजी दादा मोहोड सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा मुख्य संपादक शिदोरी मासिक काँग्रेस व श्री. मनोज भाऊ चांदुरकर अध्यक्ष वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी हे प्रामुख्याने उपस्थित होते संवाद बैठकीत जिल्ह्याचे अध्यक्ष मनोज भाऊ चांदुरकर यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची माहिती घेतली व सभेला गैरहजर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. मनोज भाऊ चांदुरकर यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपसामध्ये कुठलेही मतभेद न ठेवता एकोप्याने पक्षाचे कार्य करावे असे सांगितले. जिल्ह्याचे निरीक्षक माननीय वीरेंद्र भाऊ जगताप यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे अडीअडचणी समजावून घेतल्या व भविष्यात पक्षाला चांगले दिवस येण्यासाठी सर्वांनी जिद्दीने व एकोप्याने काम करावे.तसेच भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता गावागावात जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवावे. राहुलजींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेतून लोकांना जोडण्याचे काम राहुलजींनी केलं काँग्रेस पक्षाकरता स्वर्गीय इंदिराजी गांधी , राजीव जी गांधी यांनीआपल्या प्राणाची आहुती दिली .काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी यांनी स्वतः पंतप्रधान पदाचा त्याग करून डॉक्टर मनमोहन मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपद पदी बसवले .भविष्यात काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार असून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस अनंत बाबूजी दादा मोहोड यांनी वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री .चंद्रशेखर जोरे व सर्व सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अथक परिश्रम घेतले .कार्यक्रमांमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आर्वी तालुका महिला काँग्रेसच्या प्रज्ञा मांडवकर, आर्वी तालुक्यातील काँग्रेस युवा कार्यकर्ते, वर्धा जिल्हा समता परिषदेचे उपाध्यक्ष शुभम काळे ,युवा कार्यकर्ते अक्षय निस्ताने, राहुल येरेकर , सोपान कळमकर नरेंद्र नागपुरे राहुल बोरगडे आजी माझी सरपंच लक्ष्मणराव दहाट, श्री .शंकरराव मांढरे , नामदेव श्रीरामे,व खेड्यापाड्यातून आलेले अनेक कार्यकर्ते हजर होते .कार्यक्रमाचे संचालक वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री .चंद्रशेखर जोरे यांनी केले. आभार राहुल निस्ताने यांनी मानले. कार्यक्रमानंतर उपस्थितांकरिता चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. सर्वांनी कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.

RELATED ARTICLES
Jharkhand
scattered clouds
35.6 ° C
35.6 °
35.6 °
31 %
1.1kmh
40 %
Thu
37 °
Fri
39 °
Sat
42 °
Sun
43 °
Mon
44 °

Most Popular