HomeUncategorizedआर्वि येथे सिद्धार्थ वाचनालयात त्रिवीध पावन पौर्णिमा वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्त एक...

आर्वि येथे सिद्धार्थ वाचनालयात त्रिवीध पावन पौर्णिमा वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्त एक दिवशीय व्यक्तीमत्व विकास व संस्कार शिबीर संपन्न…!!

तालुका प्रतिनिधी आर्वी

नितीन आष्टीकर

दिनांक 14 मे 2025-

आर्वी येथे सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयात *त्रिविध पावन पौर्णिमा वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्त**एक दिवसीय संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर पार पडले*आर्वी येथील सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर तळेगाव रोड आर्वी*एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिर व संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवतेचे प्रचारक या सुप्रसिद्ध कवितासंग्रहाचे कवी व धम्म प्रचारक ग्रंथपाल सुरेश भिवगडे होते.तर प्रमुख मार्गदर्शक :- मान.राजु थूल धम्म मार्गदर्शक तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त 2022-23 होते तर प्रमुख अतिथी निळाई चे प्रा. प्रविण कांबळे व मान रजत रामटेके ( संचालक जागृती स्टुडंट्स अकॅडमी आर्वी ) व शिक्षिका शारदा झटाले मॅडम उपस्थित होते याप्रसंगीमान सहदेवरावजी भगत माजी सैनिक व उपाध्यक्ष सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी. यांचा सत्कार सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या संस्कार शिबिरातबुद्ध वंदना व ध्यानसाधना घेण्यात आली.विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावर माननीय राजू थूल यांनी सविस्तर मार्गदर्शन केलेतर उपस्थित मान्यवरांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवायचा. महामंगल सुत्त यावर मार्गदर्शन केले.माननीय रजत रामटेके यांनी इंग्लिश स्पीकिंग व इंग्रजी भाषा कशी अवगत करायची यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला निळाईचे मुख्य संयोजक प्रा. प्रवीण कांबळे यांनी पाली साहित्यातील अनेक उदाहरण देऊन बुद्ध जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाप्रसंगी सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या प्रशिक बनसोड व आकाश वलके यांचा सत्कार करण्यात आला. माननीय सुनील कांबळे यांनी बुद्ध पौर्णिमेला अनुसरून सुंदर गीत सादर केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. पंकज वाघमारे, अनिल खैरकर , शिक्षिका शारदा झटाले, नवयान युटुब चॅनल अनिल तायडे भीमराव मनवर, ज्योती तायवाडे ई मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनकिरण राजेश पाटील यांनी केले.या कार्यक्रमासाठी सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
27.8 ° C
27.8 °
27.8 °
65 %
2kmh
8 %
Fri
38 °
Sat
41 °
Sun
42 °
Mon
44 °
Tue
41 °

Most Popular