प्रतिनिधी आर्वी
नितीन आष्टीकर

दिनांक 13 जानेवारी 2026:-

पोलीस डायरीतून….
आर्वी शहरातील अवघड वार्डातील कृष्णा विलास राऊत 15 वर्षाचा मुलगा 08/05/2025 पासून लापता आहे. विलास रामरावजी राऊत वय 51 राहणार अवघड वार्ड यांचा मुलगा मोबाईल च्या लत मुळे घरून निघून गेला .मोबाईल पाहण्यासाठी नेहमी घरी चिडचिड करत असे. त्याला स्वतःसाठी एक नवीन मोबाईल हवा होता पण वडिलांनी विकत घेऊन न दिल्यामुळे कृष्णा घरून निघून गेला असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विलास रामरावजी राऊत यांनी पोलिसात 9 /5 /2025 रोजी पोलीस स्टेशन आर्वीला तक्रार दाखल केली .याप्रमाणे हकीकत सांगितले की कृष्णा हा घरा बाहेर गेला तर तो परत घरी आला नाही. त्याचा आजूबाजूला, नातेवाईकाकडे, शेजारी व मित्राकडे शोध घेतला असता मिळाला नाही व तो घरी परत आला नाही .त्याला कोणीतरी फुस लावून आपल्या सोबत पळवून नेले आहेत. असा फिर्यादीचा रिपोर्ट वरून अपराध क्रमांक 438/2025 कलम 137 बि. एन. एस. अन्वये गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. आमचे प्रतिनिधी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या कडून माहिती घेतली असता सांगण्यात आले, की सदर मुलगा हा सायकल घेऊन आर्वीत काही ठिकाणी कामाच्या शोधात गेला होता. तिथे चौकशी करण्यात आली असता, तसेच त्याच्या शाळेतील वर्गमित्र व शेजारील मित्रा कडून सुद्धा चौकशी करण्यात आली तसेच काही वेबसाईटवर सुद्धा माहिती देण्यात आली आहे. तसेच आर्वी पोलिसांची एक विशेष टीम बनवून त्याच्या शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. लवकरच शोध घेऊन त्याला त्याच्या आई-वडिलांकडे सुपुर्द करण्यात येईल. असे पोलीस प्रशासनााचे म्हणने आहे.



