
प्रतिनिधी आर्वी
दिनांक 2 फेब्रुवारी 2026

आर्वी तालुक्यातील वर्धा मनेरी येथील युवकाचा संशयास्पद स्थितीत आढळला म्रुतदेह यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
सविस्तर वृत्त असे की
दिनांक फेब्रुवारी रोजी 28 फेब्रुवारी रोजी
सकाळी दहा वाजता निलेश अशोक निखाडे वय २८ वर्ष
हा घरून बाहेर गावी जातो म्हणून आपल्या दुचाकीने वर्धा मनेरी येथून निघून गेला होता, परंतु दोन दिवस आधी
यवतमाळ जिल्ह्यातील हद्दीतील
नेरपरसोप़ंत पोलीस ठाणे हद्दीत त्याचा म्रुतदेह संशयास्पद स्थितीत रस्त्याच्या बाजुला एक जूनाट पुला खाली त्याची दुचाकी क्रमांक एम एच 32 AB 5092 हि घटना स्थळावर सापडली व त्याचे म्रुतशरीर पालथ्या अवस्थेत पोलीसांना
आढळून आले….
आमचे प्रतिनिधी यांनी नेर परसोपंत पोलीस स्टेशन च्या अधिकारी यांच्याशी
दुरध्वनीवर संपर्क केला असता प्राप्त माहिती मिळाली…
सदर घटनेच्या बद्दल प्राप्त माहीतीनूसार
वर्धमनेरी येथील युवक हा यवतमाळ जिल्ह्यातील एका मुलीसोबत मोबाईल द्वारे संपर्कात असल्याची माहिती मिळाली. तीच्याशी संपर्क करून तो
आपल्या ओळखीच्या मुलीला भेटण्यासाठी गेला असावा, आणि हि बाब मुलीच्या नातेवाईकांना समजली असावी आणि त्यांनीच हा घातपात घडवून आणला असेल अशी शंका म्रुतकाचे नातेवाईक व्यक्त करीत आहे. तसेच वर्धामनेरी येथील नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.
आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी नेर परसोपंत येथील सरकारी रुग्णालयात त्याच्या म्रुतदेहाची उत्तरीय तपासणी करून म्रुतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
आज सायंकाळी त्याच्या वर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्याचे नातेवाईकांनी दिली.
सदर घटनेचा तपास नेरपरसोपंत पोलीस स्टेशन करीत आहे.



