HomeUncategorizedआर्वी तालुक्यातील शिरपूर बोके येथील विद्यार्थीनी खुशी बोरकर हिची इस्रो मध्ये शैक्षणिक...

आर्वी तालुक्यातील शिरपूर बोके येथील विद्यार्थीनी खुशी बोरकर हिची इस्रो मध्ये शैक्षणिक दौर्यासाठी निवड…!!

जि.प.उच्च प्राथ. शाळा शिरपूर बोकेची खुशी बोरकर हिची इसरो,बेंगलोर शैक्षणिक दौऱ्यासाठी भरारी

प्रतिनिधी आर्वी

नितीन आष्टीकर दिनांक 16 फेब्रुवारी 2026
नुकतेच जिल्हा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विज्ञान प्रदर्शनात यश मिळविलेल्या वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची इसरो,बेंगलोर व अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन कुप्पम येथे दिनांक 15/2/ 2026 ते 19/2/2026 ला शैक्षणिक दौरा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला.
सदर शैक्षणिक दौऱ्या करिता जि.प.उच्च प्राथमिक शाळा,शिरपूर बोके पं.स.आर्वी या शाळेतील विज्ञान शिक्षक मारोती विरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिज्ञासा राष्ट्रीयस्तरीय विज्ञान प्रदर्शन व 53वे जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शनीत यश प्राप्त करून विज्ञानाच्या आभाळात झेप घेणारी वर्ग सहवीची विद्यार्थिनी खुशी सचिन बोरकर ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील मुलगी आज आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर इसरो,बेंगलोर कर्नाटक व अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन कुप्पम आंध्रप्रदेश येथे विमानाने पोहचलेली आहे.
या उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थी,मुख्याध्यापक तथा मार्गदर्शक शिक्षक मारोती विरुळकर, सुरेश जवंजाळ, वैशाली सातपुते व पालक यांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी महेंद्र गजबीये, प्राथमिक शिक्षणाधिकारी रुपेश कांबळे, डाएट प्राचार्य मंगेश घोगरे, प्राध्य.नवले,उर्मिला हाडेकर,सीमा पुसदकर,गटशिक्षणाधिकारी पंकज तायडे,अजय इंगोले, गीता मानमोडे, केंद्र प्रमुख लता कपले, संजय कोचाडे,शा.व्य.समिती अध्यक्ष उमेश केलव,माधुरी बावणे,अकबर शहा,विलास घोडे,घनश्याम लाधे, सुधीर बोकडे,प्रतिभा काळे,मंगला गोपाळे,आरती काळे,शिल्पा लाधे,जि.प.शिक्षकमित्र परिवार,समस्त शिरपूर गाववासी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Jharkhand
scattered clouds
24.2 ° C
24.2 °
24.2 °
52 %
1.7kmh
34 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
38 °

Most Popular