HomeUncategorizedआर्वी पोलीस स्टेशन च्या नवीन इमारती पालकमंत्री व खासदार यांच्या हस्ते भव्य...

आर्वी पोलीस स्टेशन च्या नवीन इमारती पालकमंत्री व खासदार यांच्या हस्ते भव्य शुभारंभ…!!

प्रतिनिधी आर्वी

दिनांक 4 जानेवारी 2026

वर्धा जिल्हा पोलीस विभागांतर्गत पोलीस स्टेशन ,आर्वी येथील प्रशासकीय इमारत बांधकाम भूमिपूजन समारंभ गुरुवार_ दिनांक 05/02/2026 रोज दुपारी 2 वाजता स्थळ पोलीस स्टेशन , छत्रपती शिवाजी चौक आर्वी, जिल्हा वर्धा येथे संपन्न होणार आहे. आर्वी पोलीस प्रशासकीय इमारत बांधकाम भूमिपूजन मा. ना. श्री पंकजभोयर,राज्यमंत्री ,गृह( ग्रामीण),गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, वर्धा जिल्हा यांच्या शुभहस्ते करण्याचे ठरविले आहे. तसेच प्रमुख अतिथी मा. श्री अमर काळे, खासदार वर्धा जिल्हा, मा. श्री दादारावजी केचे, सदस्य विधान परिषद ,मा.श्री अभिजीत वंजारी ,सदस्य विधान परिषद ,मा.श्री सुधाकर अडबाले, सदस्य, विधान परिषद ,मा.समीर कुणावर, आमदार, हिंगणघाट विधानसभाक्षेत्र ,मा.राजेश बकाने, आमदार, देवळी विधानसभा क्षेत्र, मा. श्री सुमितवानखेडे ,आमदार आर्वी विधानसभा क्षेत्र, मा. सौ. स्वातीताई गुल्हाने, नगराध्यक्ष नगरपरिषद आर्वी ,वरील मान्यवर उपस्थित राहणार आहे. विशेष उपस्थिती मा. श्री संदीप पाटील, (भा.पो.से.),विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर, मा. श्रीमती वान्मथी सी, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी वर्धा, मा. श्री पराग सोमण( भा.प्र.से.)मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद वर्धा ,मा.श्री हरवीर सिंग (भा.व.से.)उपवनसंरक्षक, वर्धा यांची पण उपस्थिती राहणार आहे. भूमिपूजन समारंभ कार्यक्रमाचे विनीत श्री सदाशिव वाघमारे (म.पो.से..),अपर पोलीस अधीक्षक वर्धा ,श्री सौरभ कुमार अग्रवाल, (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी केले आहे. भूमिपूजन समारंभाच्या कार्यक्रमा निमित्त आर्वीकर जनतेला एकाच ठिकाणी एक राज्यमंत्री ,एक खासदार, सहा आमदार, नगराध्यक्ष ,विशेष पोलीस निरीक्षक नागपूर, जिल्हाधिकारी वर्धा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा ,उपवनसंरक्षक वर्धा ,अप्पर पोलीस अधिकारी वर्धा, पोलीस अधीक्षक वर्धा .आदी एकाच मंचकावर उपस्थित राहण्याच अनोखा सोहळा बघायला मिळेल.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
33.3 ° C
33.3 °
33.3 °
24 %
2.1kmh
0 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
40 °
Tue
38 °
Wed
39 °

Most Popular