HomeUncategorizedआर्वी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्या तयार करून दिला प्लास्टिक मुक्तीचा संदेश...!!

आर्वी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्या तयार करून दिला प्लास्टिक मुक्तीचा संदेश…!!

प्रतिनिधी आर्वी

नितीन आष्टीकर

दिनांक 20 फेब्रुवारी 2026

महाविद्यालयात कापडी पिशव्या तयार करून दिला प्लास्टिक मुक्तीचा संदेश
स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आर्वी येथील प्राचार्य डॉ.रवींद्र सोनटक्के यांच्या संकल्पनेतून प्लास्टिक निर्मूलन जनजागृतीचा एक भाग म्हणून महाविद्यालयातीलच गृहअर्थशास्त्र व वस्त्रशास्त्र विभागाकडून कापडी पिशव्या शिवून घेतल्या. व त्यावर एका बाजूला महाविद्यालयाचे चिन्ह नाव छापील स्वरूपात मुद्रित करुन त्या पिशव्यांचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरच्या कुलगुरू डॉ.मनाली क्षिरसागर यांनी या कापडी पिशव्यांचे अनावरण केले. त्यांच्या समवेत कृषक शिक्षण संस्था आर्वीचे अध्यक्ष ॲड.श्रीमती.शोभाताई काळे, कृषक शिक्षण संस्था आर्वीचे सचिव मा.श्री.प्रदीपभाऊ काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कापडी पिशव्यांचा अनावरण करतेवेळी कुलगुरु डॉ.मनाली क्षीरसागर यांनी या उपक्रमाची स्तुती केली. नागपूर विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी प्रेरणा घेत आपल्या महाविद्यालयात सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करेल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वीचे प्राचार्य डॉ.रवींद्र सोनटक्के, नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा (घा ), येथील प्राचार्य डॉ.संजय धनवटे, श्री समर्थ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य डॉ.मोरेश्वर देशमुख, स्व.वसंतराव कोल्हटकर महाविद्यालय, रोहणाचे प्राचार्य डॉ. नितीन माथनकर यांची देखील प्रामुख्याने उपस्थिती होती. गृह अर्थशास्त्र विभागाच्या विभाप्रमुख डॉ.रोहिणी मेश्राम, वस्त्रशास्त्र विभाग व कनिष्ठ महाविद्यालयाच्या डॉ.भावना माळोदे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.आशिष पेठे यांची उपस्थिती होती.
प्लास्टिक मुक्तीच्या दृष्टिकोनातून पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने महाविद्यालयातर्फे देखील जनजागृती व्हावी व जास्तीत जास्त लोकांनी प्लास्टिक विसरून कापडी पिशव्या वापरायला सुरुवात करावी.विविध खाजगी आस्थापनांशी करार करुन भविष्यात व्यापक स्वरूपात ही मोहीम चालू करता येईल. अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्र सोनटक्के यांनी यावेळी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
23.7 ° C
23.7 °
23.7 °
23 %
0.9kmh
0 %
Fri
37 °
Sat
34 °
Sun
37 °
Mon
40 °
Tue
37 °

Most Popular