HomeUncategorizedआर्वी येथे संपन्न होणार, पाच दिवशीय मनोरंजनात्मक रोटरी उत्सव मेला...!!

आर्वी येथे संपन्न होणार, पाच दिवशीय मनोरंजनात्मक रोटरी उत्सव मेला…!!

आर्वी येथे बस डेपो आगारच्या बाजुला वर्धा रोडवर संपन्न होणार पाच दिवशीय रोटरी उत्सव महोत्सव…!!
25,26,27,28 फेब्रुवारी, 1 मार्च पर्यंत..!

प्रतिनिधी आर्वी
दिनांक 23 फेब्रुवारी 2026

आज दिनांक साई लॉन आर्वी येथे रात्री आठ वाजता, रोटरी क्लबच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती.

आर्वी तालुक्याच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत मागील पंचवीस वर्षा पासून मोलाचा वाटा असणारी सोशल कमुनिटी चैरीटी ट्रस्ट म्हणून उदयास आलेला रोटरी क्लब ऑफ आर्वी.
प्रत्येक वर्षी आर्वी शहरात गोरगरीब जनता, व विद्यार्थी यांच्या साठी तसेच सामान्य आजाराचे
आरोग्य शिबीरे घेऊन जनसामान्यांना एक मदतीचा हात देतात.
दरवर्षी काहीनाकाही उपक्रम आर्वीकरासाठी रोटरी क्लब राबवत असतात.

ज्यामध्ये क्षयरोग शिबीर, मोतीबिंदू डोळ्याचे शिबीर, चस्मे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, तसेच सायकली वाटप करून गरीब विद्यार्थ्यांना शिकण्या साठी हातभार लावतात.
तसेच वर्षाच्या सुरवातीला फेब्रुवारी महीन्या मध्ये मोठ्या उत्साहात आर्वीकरासाठी रोटरी उत्सव मेल्याचे आयोजन करून आर्वी तील समस्त जनते साठी एक विशेष इवेंन्ट सादर करत असतात.
ज्या मध्ये विद्यार्थी तसेच खुल्या गटासाठी डान्स, व करा ओके गायन स्पर्धा, वेषभुषा परिधान तसेच विद्यान प्रदर्शनी चे आयोजन करून सर्वाचे मनोरंजन तसेच उत्कृष्ट प्रदर्शन करणारे स्पर्धेकाना अनेक प्रोत्साहन पर बक्षिसे वाटप केले जातात. तसेच या ठिकाणी मोठ, मोठे दिग्गज सेलिब्रिटी राजनेत्यांची
असणार उपस्थिती.

रोटरी उत्सव मेलाची ची विशेषतः म्हणजे या ठिकाणी खानपानाचे विविध स्टाल तर्हे तर्हेचे व्यंजने, अन्य पेय, कापड, घरगुती उपकरने, किचन सामुग्री, तसेच प्रत्येक घरात उपयोगी पडेल असे सर्व साहीत्य एकाच ठिकाणी आपल्या पहायला व खरेदी करायला मिळणार आहे़.

त्याच प्रमाणे लहान मुलासाठी मोठे मोठे झुले, स्विमिंग टैन्क, ट्रैन गाडी, घोडा गाडी, ड्रैगन झुला, तसेच महीलासाठी कास्मेटीक जनरल कटलरी, विवीध पेहराव, भांड्याचे स्टा़ल तसेच लहान मोठे वाहन दुचाकी पासून तर चारचाकी तसेच शेतकऱ्यांचा साथीदार ट्रक्टर व अन्य सामान खरेदी साठी या ठिकाणी उपलब्ध असणार असल्याची माहीती रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि सचिव यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली.

तसेच रोटरी क्लब च्या वतीने या पाच दिवशीय सुरु होणाऱ्या रोटरी उत्सवाला मनोरंजनात्मक व अविस्मरणीय होण्यासाठी आर्वी वासियांनी मोठ्या संख्येने व प्रत्येक परिवाराने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष सुनील बाजपेयी सचिव रविभाऊ मंछानी व पदाधिकारी यांनी केले.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
36.4 ° C
36.4 °
36.4 °
10 %
5.9kmh
0 %
Thu
36 °
Fri
38 °
Sat
37 °
Sun
39 °
Mon
41 °

Most Popular