
काश्मीरच्या लॉ विदयार्थ्यांची ग्रा.पं.रसुलाबाद ला भेट
आम्ही येथे येऊन खुप खुश झालो – काश्मिरी विद्यार्थी

तालुका प्रतिनिधी
नितीन आष्टीकर
दिनांक 20 फेब्रुवारी 2026:- आर्वी – रसुलाबाद
कश्मीर म्हटले की आपल्या डोळ्या समोर उभी राहते ती सुंदरता मग तेथील पर्यटन स्थळ असो की मग ते शेप, अक्रोड, चेरी, केसर बाग असो की तेथील पहाड, बर्फ, डल लेख, अमरनाथ असेच दृश्य समोर येतात. त्यात काही गोष्टींची भीती सुद्धा वाटते त्यात आपले लष्करी जवान त्यांच्या जवाबदारी व शहिद होण्याचे प्रमाण, आतंकवाद आणि तिथे होणाऱ्या आतंकवादी गतिविधी. या भीती काश्मीर मधील जनतेच्या व भारतातील जनतेच्या मनातून निघावी याकरिता हा अभ्यास दौरा काश्मीरी संस्थेच्या माध्यमातून केंद्र सरकार ने महाराष्ट्र मधील बचतगट च्या माध्यमातून आयोजित केलेला होता.
ग्रामपंचायत रसुलाबाद हे नवाबचे गाव असुन येथे हिंदू मुस्लिम व इतर जाती धर्माचे लोकं राहतात. काश्मीर मधील लोकांना महाराष्ट्र मध्ये कसे वातावरण आहे ते अभ्यासण्याच्या दृष्टीने यांचा हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
ग्रा.पं. रसुलाबाद यथे काश्मिरी टीम चे स्वागत मोठ्या उत्साहात रसुलाबादचे सरपंच आणि महिला बचत गट यांच्या वतीने करण्यात आले.
काश्मिरी टीम ला रसुलाबाद गावच्या बाबतीत माहिती देण्यात आली, गावामध्ये हिंदू मुस्लिम एक्य असुन सर्व धर्म समभाव आहे. ग्रामपंचायत ने आतापर्यंत स्मार्ट ग्राम पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता ग्राम पुरस्कार, घरकुल पुरस्कार, माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त केलेला आहे.
ग्राम महिला बचत गटाच्या कार्याच्या संदर्भात बचत गट कसे कार्य करते, त्यांना मिळणाऱ्या सोई सुविधा, रोजगार, लघु उद्योग यावर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांनी लघु उद्योग, डिजिटल सखी व गृह उद्योग चालवणारे बचतगट यांना भेट दिली.
काश्मिरी टीम ने जि.प.उच्च प्राथ व माध्य शाळा, अंगणवाडी, आरोग्य उप केंद्र यांना भेटी दिल्या. भेट दिल्यानंतर त्यांनी आम्ही येथे येऊन खुप खुश झालो या वाक्यात स्तुती केली.
बचत गटाच्या वतीने त्यांना पाऊणचार देण्यात आला.
यावेळी विचार विकास संस्था चे अधिकारी नितीन आकुलवार, सारिकाताई चौरे, कल्पना चम्बुलवार, अपेक्षा संस्था मोजरी चे गजानन काळे
बचतगट सि.आर.पी. सविता आसोले, वैशाली ढोले, अर्चना आकडे, माजी सरपंच विना राऊत, डिजिटल सखी पायल लोहबरे, गायत्री बांगडकर, मुस्लिम कमेटी अध्यक्ष फिरोज खान, शेख रफिक व मुस्लिम महिला यांनी त्यांना इथे गुण्यागोविंदाणे कसे राहतो याबाबत मार्गदर्शन केले यावेळी इतर बचत गटाच्या शेकडो महिला उपस्थित होत्या.





