HomeUncategorizedडॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाची वार्षिक बैठक उत्साहात संपन्न...!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाची वार्षिक बैठक उत्साहात संपन्न…!!

प्रतिनिधी धामणगांव रेल्वे

अंजनसिंगी (दि. 17 मार्च 2026): अंजनसिंगी येथे पद्माकर वाहिले, धामणगाव रेल्वे यांच्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान या धार्मिक व सामाजिक संघटनेची वार्षिक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानात्मक कार्यक्रमांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अभियानाच्या मार्गदर्शिका प्रा. नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. इंदुताई नारनवरे या होत्या. तर अभियान प्रमुख जगदीश शिंदे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या श्रावणेर (श्रामनेर) शिबिराच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. हे शिबिर कोणत्या ठिकाणी घ्यावे याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला.

शिबिरासोबत धम्म कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला. अभियानाची कार्यव्याप्ती वाढविण्यासाठी व्यक्त करण्यात आली. बुद्ध धम्माचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे कार्य करावे, प्रत्येक तालुक्यात संघटन उभारण्याची आवश्यकता असे आवाहन करण्यात आले. अभियान प्रमुख जगदीश शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “अभियान हे आपले स्वतःचे कार्य समजून सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. मनात कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका न ठेवता बुद्ध धम्माचा

प्रसार महाराष्ट्रभर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.” या बैठकीस अभियान सचिव रविंद्र कांबळे, डॉ. अमोल श्रीरामे, प्रा. डॉ. मिलिंद गजभिये, जिल्हा प्रमुख यवतमाळ सुनील शिंदे, बंडू आठवले, अभियान प्रसिद्धी प्रमुख पद्माकर वाहिले, महिला संघटिका पपीता मनोहरे, मृदुलता हेरोडे, प्रतिभा डोंगरे, बेबी जामनिक, सिंधू लोखंडे, तिवसा तालुका प्रमुख बंडूभाऊ ढोणे, आर्वी तालुका प्रमुख मायाताई काळबांडे, दक्ष शिंदे यांच्यासह अभियानाचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकीत भविष्यातील कार्याचा आराखडा निश्चित करत बुद्ध धम्माच्या प्रसारासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करण्यात आला.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
26.4 ° C
26.4 °
26.4 °
27 %
1kmh
0 %
Thu
36 °
Fri
38 °
Sat
37 °
Sun
39 °
Mon
41 °

Most Popular