HomeUncategorizedधरतीबाबा भगवान बिरसा मुंडा जनजाती गौरव यात्रेचे हिंगणघाट येथे विश्व हिंदू परिषद...

धरतीबाबा भगवान बिरसा मुंडा जनजाती गौरव यात्रेचे हिंगणघाट येथे विश्व हिंदू परिषद तर्फे उत्साहात स्वागत…!!

तालुका प्रतिनिधी

रिझवान शेख
हिंगणघाट

  दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी हिंगणघाट येथे
   अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ  प्रांत यांच्या वतीने क्रांतिकारी आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त जनजाती गौरव यात्रेची भव्य सुरुवात दिनांक ०१ जानेवारी २०२६ रोजी धारणी, मेळघाट येथून मोठ्या उत्साहात करण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांच्या राष्ट्रभक्ती, सामाजिक जागृती, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व जनजाती समाजाच्या गौरवशाली इतिहासाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प अभाविपने केला आहे.

हीं यात्रा हिंगणघाट येथे पोहचली असता विश्व हिंदू परिषदेतर्फे यात्रेचे स्वागत करून यात्रेत असणाऱ्या अभावीप कार्यकर्त्यांचे राम नामाचा दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आले,यात्रेच्या प्रारंभी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी संदेश उरकुडे (अमरावती जिल्हा विस्तारक), जय शिंदे (वर्धा नगर विस्तारक), रितेश बोभाटे (हिंगणघाट नगर सहमंत्री), बादल लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला या वेळी वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, वर्धा जिल्हा विहिपं मंत्री शरद कोणप्रतिवार, हिंगणघाट तालुका संघचालक विनोद नांदुरकर, कार्यवाह पंकज आत्राम, हिंगणघाट प्रखंड विहिपं मंत्री देवा वाघमारे, सुरज वरठी, गौरव तांबोळी तसेच अभाविपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनजाती समाजाच्या सन्मानासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी ही यात्रा प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
Jharkhand
few clouds
33.9 ° C
33.9 °
33.9 °
19 %
4.3kmh
22 %
Sat
32 °
Sun
36 °
Mon
40 °
Tue
38 °
Wed
39 °

Most Popular