
कारंजा तालुका प्रतिनिधी
सतीश तागडे


दि.२५/०२/२०२६कारंज्या तालुक्यातील ग्रामपंचायत खरसखांडा येथे भारत सरकारच्य निती आयोगांअनतर्गत नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, विदिशा दास यांनी अकांशित तालुका कार्यक्रमांतर्गत खरसखांडा येथील अंगणवाडीला क्षेत्रीय भेट दिली.

या भेटीदरम्यान अंगणवाडीतील कामांची पाहणी व कामांचा आडावा घेण्यात आला.तसेच अंगणवाडी तील सोयी सुविधा पोषण आहार व परसबागेची पाहणी करण्यात आली. यावेळी निती आयोग अधिकायांनी अंगणवाडीतील मुलांचे कौतुक केले व झालेल्या कामावर समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी कारंजा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी श्री दुबे सर, विस्तार अधिकारी श्री. घोडे सर महीलां अणि बाल प्रकल्प अधिकारी मानकर मॅडम, अकांशीत तालुका समन्वयक किरणाके अंगणवाडी पर्यवेक्षिका सांडेकर मॅडम, पंचायत समिती सेथील कर्मचारी तसेच गावातील सरपंचा शेवेता कोडापे अंगणवाडी सेविका, आशा, सी आरपी, मुख्याध्यापिका पदाधिकारी
ग्रामस्थ व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
या क्षेत्रीय भेटीदरम्यान गावातील दगडी बंधारे बांधकामाची पाहणी करण्यात आली. यावेळी इथा. पं अधिकारी कू धनश्री बेलसरे यांनी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत सुरु असलेल्या कामांची माहीती दिली. या गावामध्ये झालेल्या सर्व कामांची प्रशंसा अधिकारी यांनी व्यक्त केली शेवटी ग्रा. पं आधिकारी के धनश्री बेलसरे यांनी सर्वांचे आभार मानले.









