
फक्त दिखावा…जुण्याच पुलाला केले नविन…
प्रतिनिधी – नितीन आष्टीकर

आर्वी, डिसेंबर 30:
आर्वी तालुक्यातील ग्राम नांदपूर ते लाडेगाव रोड वर पुलाचे बांधकाम सुरू आहे, जे अतिशय निकृष्ठ दर्जाचे केले जात आहे. या कामाबद्दल लाडेगाव गावातील लोकांनी आक्षेप घेतला आहे. परंतु निकृष्ठ दर्जाचे बांधकाम सुरूच आहे. हे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम संबंधित विभागाच्या इंजीनियरिच्या व अधिकार्यांच्या आशिर्वादाने होत असून
संबंधित इंजीनियर वर व अधिकार्यांवर कार्यवाही करण्यात यावी, याकरिता लाडेगाव गावातील नागरीक, माननीय जिल्हाधिकारी, वर्धा यांना तक्रार दाखल करणार आहे.

पूलाची उंची न वाढवता, जुन्याच पुलावर सिमेंट कॉंक्रीटचा थर टाकण्यात आलेला आहे. जुने लहान तुटलेले पाईप काढून, नविन मोठे पाईप टाकून पुलाची उंची वाढविणे, हे परिसरातील लोकांना अपेक्षित होते. परंतु जुन्याच तुटलेल्या पुलावर सिमेंट कॉंक्रीटचा थर टाकून, फक्त शासनाच्या अधिकार्यांनी पुल बांधण्याचा दिखावा केलेला आहे. यामुळे पुलावरुन येने जाने करणार्या लोकांचा त्रास संपणार नाही. नेहमी प्रमाणेच पावसाळ्यात पुलावरुन पाणी वाहणार. म्हणजेच समस्या जशाच्या तशाच…
याच रस्त्यावरील पुलांचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याकरिता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, श्री अरविंद लिल्लोरे यांनी चार महिन्यापूर्वी निवेदन दिले होते..

पुलांचे बांधकाम नियमानुसार न झाल्यास, अरविंद लिल्लोरे गावातील लोकांना सोबत घेऊन करणार आंदोलन…करणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सागितले…!






