HomeUncategorizedबजरंग दल वर्धा यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या जल्लोषात साजरी...!!

बजरंग दल वर्धा यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या जल्लोषात साजरी…!!

प्रतिनिधी
वर्धा

दिनांक 9 मार्च 2026
बजरंग दल वर्धा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती धुम धडाक्यात साजरी….!!
वर्धा येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज वर्धा येथील भव्य दिव्य अश्या महाराजांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याची आठवण करून दिली. तसेच त्यांच्या आदर्शांवर चालत समाजात एकता, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम वाढविण्याचा संकल्प करण्यात आला.या वेळी शिवाजी महाराजांचा पाळणा गाऊन व ढोल ताशा पथकांनी या कार्यक्रमांची शोभा वाढविली कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विदर्भ प्रांत विहिप संघटन मंत्री विष्णू देशमुख, विदर्भ प्रांत विहिप स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे, वर्धा जिल्हा विहिप अध्यक्ष सुभाष राठी, वर्धा जिल्हा विहिप मंत्री शरद कोणप्रतिवार, सहमंत्री अरविंद कोकाटे, सहमंत्री संजय पोफळी,विहीपचे विशाल शाश्त्री,सचिन लिखितकर,मातृशक्तीच्या जिल्हा सेवा प्रमुख माया खरंदकर, दुर्गावाहिनी जिल्हा संयोजिका पूनम भोयर, सहसंयोजिका ऍड स्वाती दोडके या वेळी उपस्थित होत्या..या कार्यक्रमाचे आयोजन बजरंग दलाचे जिल्हा संयोजक महेश राऊत, सहसंयोजक अमोल अतकर, सहसंयोजक प्रशांत यादव, नगर संयोजक किरण उपाध्याय आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी केले. या वेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते, मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
34.5 ° C
34.5 °
34.5 °
14 %
2.4kmh
0 %
Thu
36 °
Fri
38 °
Sat
37 °
Sun
39 °
Mon
41 °

Most Popular