HomeUncategorizedभारत सरकार निती आयोगा अंतर्गत नियुक्त अधिकारी यांची सौर ग्राम नागलवाडी येथे...

भारत सरकार निती आयोगा अंतर्गत नियुक्त अधिकारी यांची सौर ग्राम नागलवाडी येथे भेट…

भारत सरकार नीती आयोगा अंतर्गत नियुक्त अधिकारी यांची सौर ग्राम नागलवाडी येथे भेट *

प्रतिनिधी कारंजा घा.

दि. 17/12/2025 ला ग्राम पंचायत भालेवाडी अंतर्गत गट ग्राम पंचायत नागलवाडी येथे भारत सरकार चे नीती आयोगा कडून नियुक्ती केलेले मा .श्री रविकिरण उबाळे , संचालक निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग भारत सरकार तथा केंद्रीय प्रभारी अधिकारी आकांशीत तालुका कार्यक्रम, कारंजा यांनी सौर ग्राम नागलवाडी येथे भेट दिली.
नागलवाडी ग्रामस्थांनी या क्षेत्रिय भेटीला उपस्थित सर्व प्रमुख अधिकारी व मान्यवरांचा सामूहिक सत्कार केला.
यावेळी पंचायत समिती कारंजा (घा ) चे गट विकास अधिकारी श्री प्रविण जी देशमुख , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सरिताताई वि. गाखरे , महिला बालविकास प्रकल्प अधिकारी मा. जिंनेवार, ग्राम पंचायत प्रशासक मा . यशोदा पाटील , विस्तार अधिकारी श्री कैलास वानखेडे, विस्तार अधिकारी श्री महेश घोडे, विस्तार अधिकारी श्री अमोल धोटे,विस्तार अधिकारी श्री खंडार, तसेच ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कारंजा (घा) येथिल शाखा अभियंता श्री दिनेश पाडेन, श्री आकाश चरडे(JE),जितेश गाखरे , श्री अक्षय मेहत्कर (JE) व जि प वर्धा अंतर्गत इतर अधिकारी उपस्थित होते.
या क्षेत्रिय भेटी मध्ये महिला उद्यमिता केंद्राला भेट देऊन सुरू असलेल्या विविध प्रकारच्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली,
गावातील वीजवितरण ग्राहकांना भेट देऊन प्रधान मंत्री सूर्य घर योजनेचा ग्रामस्थांना लाभ कसा होत आहे याची प्रत्येक्ष माहिती जाणून घेतली.
गावातील सर्व वीज वितरण ग्राहकांची 100% सोलर ग्राम साठी ऑनलाईन नोंदणी झाली असून आस्थापीत करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्प बाबत समाधान व्यक्त केले.
नागलवाडी येथे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची प्रत्येक्ष पाहणी करून त्याबद्दल गावकऱ्यांचे कौतुक करण्यात आले.
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावचे पोलीस पाटील, बचत गटाच्या महिला, तरुण ,जेष्ठ नागरिक, ग्राम पंचायत चे कर्मचारी, प्राथमिक शाळा , अंगणवाडी सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले,
त्यांबद्दल ग्राम पंचायत अधिकारी श्री राजू शेंदरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
Jharkhand
few clouds
33.9 ° C
33.9 °
33.9 °
19 %
4.3kmh
22 %
Sat
32 °
Sun
36 °
Mon
40 °
Tue
38 °
Wed
39 °

Most Popular