
आष्टी तालुका (प्रतिनिधी):
प्रितम गायकी
आज दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी आष्टी शहीद
येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात, ‘राष्ट्रीय भूमापन दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय भूमापन विभागाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यालयातील मोजणी यंत्रांच्या (Survey Instruments) पारंपरिक आणि शास्त्रोक्त पूजनाने करण्यात आली. जमिनीची अचूक मोजणी करून नागरिकांना पारदर्शक सेवा देणाऱ्या या साधनांप्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिरक्षण भूमापक कृष्णा डुबे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात १० एप्रिल १८०२ रोजी कर्नल विल्यम लॅम्बटन यांनी सुरू केलेल्या ‘द ग्रेट ट्रिगोनोमेट्रिकल सर्व्हे’च्या (GTS) ऐतिहासिक प्रवासाची माहिती दिली. आधुनिक मोजणी यंत्रणेमुळे कामात आलेली अचूकता आणि गती यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला.
यावेळी उपअधीक्षक भूमी अभिलेख श्री. मोहन वनवे हे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत तळेगाव येथे आयोजित शिबिरात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करत होते.
या कार्यक्रमाला विजय नेरकर, प्रितम गायकी, रामप्रकाश गायकी, VLE समीर हरले, कोमल ठोंबरे आणि शिवकुमार नागोसे यांच्यासह उपअधीक्षक कार्यालयातील सर्व भूकरमापक, निमतानदार आणि कार्यालयीन कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्याच्या काळात ई-मोजणी आणि रोव्हर सारख्या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून नागरिकांचे जमिनीचे वाद कमी करण्यावर या दिनानिमित्त भर देण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.



