HomeUncategorizedमाझी वसुंधरा अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत मिर्झापूर नेरी ने रचला इतिहास.. …….सलग दुसऱ्यांदा 50...

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत मिर्झापूर नेरी ने रचला इतिहास.. …….सलग दुसऱ्यांदा 50 लाखाचा पटकावला पुरस्कार…!!

दिनांक 17 फेब्रुवारी 2026

आर्वी – मिर्झापुर नेरी –

*मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 21 फेब्रुवारीला मुंबईत होणार पुरस्काराचा वितरण सोहळा संपन्न…

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मागील वर्षी 4.0 अंतर्गत 50 लाखाचे बक्षीस प्राप्त करून यावर्षी पुन्हा 5.0 अंतर्गत अभियानामध्ये सहभाग नोंदवून यावर्षी सुद्धा राज्यस्तरीय50 लाख रुपयाचा प्रथम पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील आर्वी पंचायत समिती अंतर्गत आदर्श ग्राम संसद मिर्झापूर नेरी ने पटकावला असून दिनांक 21 फेब्रुवारीला मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते या पुरस्काराचे मोठ्या दिमाखात आणि शानदार शासकीय सोहळ्यात वितरण होणार आहे याबाबत ग्रामपंचायतचे सरपंच बाळा सोनटक्के यांना सोहळ्याचे निमंत्रण प्राप्त झाल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी संजय यावले यांनी दिली
असून या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या विशेष पुरस्कारामध्ये सुद्धा आर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण यांना पुरस्कार घोषित झाला आहे.

हा तर मिर्झापूरवासियांचा सन्मान – सरपंच बाळा सोनटक्के

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाअंतर्गत 4.0 आणि 5.0 अंतर्गत सलग प्रत्येकी 50 लाखाचा प्राप्त झालेला पुरस्कार हा मिर्झापूर वासियांच्या मेहनतीचे व माझे मार्गदर्शक प्रेरणास्थान आमदार सुमित वानखडे यांच्या मार्गदर्शनाचे हे फळ असून माझ्या गावातील लोकांनी दिलेली अमूल्य साथ आणि ग्रामपंचायत अधिकारी शेंद्रे व संजय यावले यांनी घेतलेली शब्दातील मेहनत यामुळे हे यश प्राप्त झाले असून प्रत्येक गावाने सर्वांना सोबत घेऊन ऐक्याची वज्रमूठ बांधून मेहनत घेण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक गाव आदर्श गाव म्हणून समोर येऊ शकते मिर्झापूर नेरी सारखी गावे विविध अभियानातून विकासाच्या प्रवासात समोर आली पाहिजे अशी प्रतिक्रिया पुरस्कार प्राप्त गावाचे सरपंच बाळा सोनटक्के यांनी दिली.

तसेच आर्वी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान
आमदार सुमित वानखेडे यानी प्रतिक्रिया दिली असता

*मिर्झापूर नेरी हे गाव राष्ट्रसंतांच्या विचारावर कार्य करणारे गाव आहे –

माझ्या मतदारसंघातील मिर्झापूर नेरी हे गाव एक विकासात्मक रोल मॉडेल बनत असून या गावातील ग्रामस्थांनी त्यावर जिद्द चिकाटी आणि मेहनतीने सरपंच बाळा सोनटक्के यांच्या साथीने.. नेतृत्वात विकासाची जी लढाई सुरू ठेवली आहे.
या नेतृत्वाचे आणि साथ देणाऱ्या ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन करत असताना मिर्झापूर नेरीला प्राप्त झालेला हा पुरस्कार बद्दल खूप खूप शुभेच्छा देतो.

RELATED ARTICLES
Jharkhand
scattered clouds
24.2 ° C
24.2 °
24.2 °
52 %
1.7kmh
34 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
38 °

Most Popular