HomeUncategorizedवर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी द्वारा, प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य जिल्हा स्तरीय देशभक्ती गीत...

वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी द्वारा, प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य जिल्हा स्तरीय देशभक्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन…!!

प्रतिनिधी वर्धा – दिनांक 25 जानेवारी 2026

जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य जिल्हास्तरीय देशभक्ती व प्रेरणादायी गीतगायन स्पर्धा आयोजन. …!!

वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीके और से “26 जनवरी की शाम, वीर महापुरुषों के नाम”. ….!!

उद्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हास्तरीय देशभक्ती व प्रेरणादायी गीतगायन स्पर्धेचे आयोजन मागील तीन वर्षापासून वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमींन कडून करण्यात येते. जिल्ह्यातून व बाहेरील जिल्ह्यातील सुद्धा जवळपास 100 स्पर्धक सहभागी झाले होते व स्पर्धेची पूर्व चाचणी ही शनिवार दिनांक 24 जानेवारी सकाळी 9:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत इंदिरा सद्दभावना भवन, मगन संग्रहालयासमोर, बॅचलर रोड, वर्धा येथे पार पाडण्यात आली. मुख्य स्पर्धेचे परीक्षण संगीत विशारद श्री. श्रीकांतजी झाडे संचालक स्वरनाद म्यूझिक एकॅडमी व अपूर्वाताई देशमुख बी.ए. एम.एड. संगीत विशारद हे करणार तसेच जिल्हातील नामवंत संगीत वादक कार्यक्रमाला साथ देणार आहे. मुख्य कार्यक्रम हा सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 ला सायंकाळी 4:00 ते 8:00 पर्यंत कार्यालयाच्या परिसरासमोर होणार आहे. दरवर्षी कार्यक्रमाला पक्षाच्या संबंधित कोषानुसार शिर्षक दिला जाते, यावेळी “मनरेगा बचाव संग्राम” या शीर्षकाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभास पक्षाचे व जिल्ह्यातील संपूर्ण नेत्यांसह सर्व विभागीय अध्यक्ष, शहर अध्यक्ष व पदाधिकारींना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संचालन श्री. मिलिंदभाऊ झांबरे (सेलू, घो.) व सौ. अरुणाताई मो. सावरकर (कारंजा, घा.) करणार आहे. स्पर्धेमध्ये रोख पारितोषिक, विशेष पुरस्कार व सर्व स्पर्धकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तरीही वर्धेतील सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन कर्त्यांकडून म्हणजेच वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमींच्या वतीने करण्यात येत आहे.

तरी सर्व वाचक वर्ग तसेच वर्धा कर आपण सर्व सादर आमंत्रित आहात…!!

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
25.8 ° C
25.8 °
25.8 °
17 %
2.5kmh
0 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
32 °

Most Popular