HomeUncategorizedवर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद विशेष संपर्क प्रमुखपदी गजानन मसाये यांची निवड...!!

वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद विशेष संपर्क प्रमुखपदी गजानन मसाये यांची निवड…!!

प्रतिनिधी हिंगणघाट

दिनांक 15 जानेवारी 2026


वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद विशेष संपर्क प्रमुख पदी गजानन मसाये यांची नियुक्ती….

वर्धा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषदच्या संघटनात्मक बांधणीस अधिक बळ देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद वर्धा जिल्हा कार्यकारिणीच्या मान्यतेने गजानन मसाये यांची वर्धा जिल्हा विशेष संपर्क प्रमुख पदी नियुक्ती वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद मंत्री शरद कोणप्रतिवार यांच्या हस्ते करण्यात आली या वेळी जिल्हा धर्म प्रसार प्रमुख अजय भोंग, हिंगणघाट प्रखंड मंत्री देवा वाघमारे, मारोती सहारे, संतोष बघेल, पंकज देशपांडे, कार्तिक या वेळी उपस्थित होते.. गजानन मसाये हे दीर्घकाळ सामाजिक, धार्मिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय असून, विविध स्तरांवर त्यांनी प्रभावी संपर्क साधत हिंदुत्ववादी विचार समाजापर्यंत पोहोचवले आहेत. त्यांच्या अनुभवाचा व कार्यक्षमतेचा निश्चितच संघटनेला लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 
   या नियुक्तीबद्दल विदर्भ प्रांत विहिपं मंत्री प्रशांत तितरे,विदर्भ प्रांत विहिपं स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे, यवतमाळ विभाग विशेष संपर्क प्रमुख अजिंदर सिंग चावला, वर्धा जिल्हा अध्यक्ष सुभाष राठी,विहिपं वर्धा जिल्हा सहमंत्री अरविंद कोकाटे, बजरंग दल जिल्हा संयोजक महेश राउत, हिंगणघाट प्रखंड अध्यक्ष सुरेंद्र आगरे तसेच सर्व स्तरातून गजानन मसाये यांचे अभिनंदन होत आहे.
RELATED ARTICLES
Jharkhand
few clouds
33.9 ° C
33.9 °
33.9 °
19 %
4.3kmh
22 %
Sat
32 °
Sun
36 °
Mon
40 °
Tue
38 °
Wed
39 °

Most Popular