HomeUncategorizedवर्धा शहरात ड्रग्जची विक्री करणार्या आरोपीस रामनगर पोलिसांनी केली अटक...!!

वर्धा शहरात ड्रग्जची विक्री करणार्या आरोपीस रामनगर पोलिसांनी केली अटक…!!

दिनांक 20 फेब्रुवारी 2026

पोलीस स्टेशन रामनगर येथिल गुन्हे शोध पथकांनी मँफेडॉन (एम.डी) ची विक्री करणाऱ्या इसमावर धडक कार्यवाही करुन केले अटक.

रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील घटना

आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हेशाखा शोध पथकास विश्वसनिय सुत्रांकडून गुप्त माहीती मिळाली की, एक इसम अंदाजे 23 ते 25 वर्षाचा फुल बायाचे वेगवेगळया रंगाचे टि शर्ट आणि राखाडी रंगाचा जिन्स पॅन्ट परिधान केलेला अशा वर्णनाचा इसम पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील कारला चौक येथे अंमली पदार्थ विक्री करीता स्वतःजवळ बाळगुन फिरत आहे.
अशी विश्वसनीय माहिती मिळाल्याने सविस्तर माहीती प्रभारी ठाणेदार भुसारी रामनगर वर्धा यांना देवुन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा यांचे रेड कारवाई करणेबाबत लेखी आदेश घेवुन सदर रेड कार्यवाही करीता दोन प्रतिष्ठीत पंच, व संपुर्ण सिल साहित्य, कागद, कार्बन व मापारी इलेक्ट्रानिक वजन काट्यासह, लॅपटॉप, प्रिंटर, बॅटरी तसेच फॉरेन्सीक व्हॅन, फोटोग्राफर सह पोलीस निरिक्षक भुसारी सहाय्यक पोलीस निरिक्षक अंबादास टोपले, पोलीस उप निरीक्षक अमोल चाटे,सहाय्यक फौजदार राजु शाहु पोलीस हवालदार योगेश चन्ने, पोलीस हवालदार अजहर खान, नापोशी नितेश वैद्य, पोलीस अंमलदार घनश्याम पाटील, पोलीस अंमलदार, सचिन पवार पोलीस अंमलदार, सुरज राठोड, पोलीस अंमलदार भुषण दांडेकर, पोलीस अंमलदार प्रशांत शाहु, पोलीस अंमलदार, प्रसाद शिंदे, राहुल भोयर, सह वरील खबरे प्रमाणे रवाना झालो असता वरिल नमुद वर्णनाचा इसम कारला चौक,वर्धा येथील शनिमंदीराच्या पाठीमागे सुझुकी कंपनीची बाईक, रंग-शॅडो ग्रिन, मॉडेल – बर्गमॅन ,क्रमांक एम.एच.32 के.वाय. 85. 10 बाईकवरून जुनेद खॉ शकील खॉ पठाण वय 23 वर्ष, रा.इंदीरा नगर,आर्वी नाका वर्धा. हा बसुन दिसला तो आम्हा पोलीसांना पाहताच पळुन जात असता पोलीस स्टापचे मदतीने त्यास ताब्यात घेवुन त्याची कायदेशिररित्या अंगझडती घेतली असता त्याचे सुझुकी बर्गमँन मोपेड गाडीचे डिक्की मध्ये अकरा प्लास्टीकच्या पाऊच पिशव्या मध्ये पांढऱ्या रंगाचे पावडर (एमडी) मेफेडॉन 04. 43 ग्रँम किंमत अंदाजे 17 हजार 720/-रूपये आणि एक विवो कंपनीचा अंन्डरॉईड मोबाईल किंमत अंदाजे 15,000/- एम.डि. विक्रीचे रोख रक्कम 500/-रूपयाच्या 08 नोटा एकुण 4,000/-रूपये तसेच एक सुझुकी कंपनीची मोपेड गाडी, रंग-शँडो ग्रिन मॉडेल – बर्गमॅन, गाडी क्रमांक एम.एच.32 के.वाय. 85.10 तीची किंमत अंदाजे 1 लाख 20, हजार/- रूपये असा एकुन जुमला किंमत 1 लाख 56 हजार 720 रुपये असा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सविस्तर घटनास्थळ मौका जप्ती पंचनामा कार्यवाही करुन वरिल वर्णनाचा मुद्देमाल जप्त करुन पोलीस स्टेशन रामनगर येथे परत येवुन आरोपी विरुध्द अपराध क्रमांक 153 / 2026 कलम 8 (क), 21 (बी) एन.डि.पी.एस. अँक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक,  सदाशिव वाघमारे वर्धा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मक्केश्वर,  वर्धा यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक,  अजय भुसारी यांचे निर्देशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले,  अमोल चाटे व गुन्हेशाखा प्रगटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश कांबळे, यांनी केली यावेळी  राजू शाहु, योगेश चन्ने, अजहर खान, नितेश वैद्य, अंमलदार घनश्याम पाटील, सचिन पवार, राहुल भोयर, सुरज राठोड, भुषण दांडेकर, प्रशांत शाहु, गजानन मस्के,  विशाल देवकाते, प्रसाद शिंदे  यांनी केली आहे.
RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
60 %
1.9kmh
100 %
Fri
23 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular