HomeUncategorizedविश्व हिंदू परिषद, वर्धा जिल्हा मंत्री पदी हिंगणघाट येथील शरद कोणप्रतीवार यांची...

विश्व हिंदू परिषद, वर्धा जिल्हा मंत्री पदी हिंगणघाट येथील शरद कोणप्रतीवार यांची निवड…!!

प्रतिनिधी हिंगणघाट

रिजवान शेख..

दिनांक 5 जानेवारी 2026 :-

विश्व हिंदू परिषद वर्धा जिल्हा मंत्री पदी शरद कोणप्रतिवार यांची नियुक्ती…

नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसीय विश्व हिंदू परिषदेच्या विदर्भ प्रांत बैठकीत संघटनात्मक दृष्टीने हिंगणघाट येथील शरद कोणप्रतीवार यांची विश्व हिंदू परिषद, वर्धा जिल्हा मंत्री या महत्त्वपूर्ण जबाबदारीच्या पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ते वर्धा जिल्हा सहमंत्री म्हणून कार्यरत होते.
शरद कोणप्रतीवार हे गेल्या अनेक वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत असून संघटन विस्तार, सामाजिक कार्य, तसेच हिंदू समाज प्रबोधनाच्या कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. त्यांच्या कार्यतत्परतेची, शिस्तबद्ध कामकाजाची व संघटन कौशल्याची दखल घेऊन विदर्भ प्रांत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या नियुक्तीमुळे वर्धा जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल, संघटन अधिक बळकट होईल तसेच हिंदू युवकांचा सहभाग, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वर्धा जिल्ह्यात 13 प्रखंड असून संपूर्ण प्रखंडात विश्व हिंदू परिषदेचे काम मोठे कसे होईल याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
शरद कोणप्रतीवार यांच्या नियुक्तीबद्दल विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे, सहमंत्री देवेश मिश्रा, सहमंत्री गणेश काळकर, विहिपं विदर्भ प्रांत स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे,मातृशक्ती विभाग संयोजिका अनुराधा महाकाळकर, वर्धा जिल्हा अध्यक्ष सुभाष राठी,वर्धा जिल्हा उपाध्यक्ष संजय जलताडे, संजय बडगेलवार, देवानंद धुर्वे, माजी मंत्री अनिल कावळे, वर्धा जिल्हा सहमंत्री अरविंद कावळे, बजरंग दल वर्धा जिल्हा संयोजक महेश राऊत, जिल्हा सहसंयोजक अमोल अतकर, सहसंयोजक प्रशांत यादव,, बजरंग दल जिल्हा सुरक्षा प्रशान्त तिवारी, बजरंग दल जिल्हा गौरक्षा प्रमुख सचिन पाचघरे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदुत्वप्रेमी नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून आप्त स्वकीया कडून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
Jharkhand
few clouds
33.9 ° C
33.9 °
33.9 °
19 %
4.3kmh
22 %
Sat
32 °
Sun
36 °
Mon
40 °
Tue
38 °
Wed
39 °

Most Popular