
प्रतिनिधी हिंगणघाट
दिनांक 21 जानेवारी 2026
विश्व हिंदू परिषद वर्धा जिल्हातील महत्वपूर्ण नियुक्त्या जाहीर.....
वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक साई मंदिर, वर्धा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद सहमंत्री म्हणून संजय पोफळी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच वर्धा जिल्हा विहिप गौरक्षा व गौसंवर्धन प्रमुख म्हणून संजय मोहता यांना जबाबदारी देण्यात आली. याचबरोबर वर्धा जिल्हा दुर्गा वाहिनी सहसंयोजिका म्हणून अॅड. स्वाती दोडके यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली यावेळी विदर्भ प्रांत विहिपं स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे, वर्धा जिल्हा विहिप अध्यक्ष सुभाष राठी, उपाध्यक्ष संजय बडगेलवार,वर्धा जिल्हा विहिप मंत्री शरद कोणप्रतिवार, सहमंत्री अरविंद कोकाटे, वर्धा जिल्हा बजरंग दल संयोजक महेश राऊत, सह संयोजक अमोल अतकर, सहसंयोजक प्रशांत यादव, वर्धा जिल्हा दुर्गा वाहिनी संयोजिका पूनम भोयर या वेळी उपस्थित होते.नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे संघटनात्मक कार्य अधिक गतिमान होऊन हिंदू समाजहिताचे कार्य प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे वर्धा जिल्हा मार्गदर्शन मंडळ सदस्य सुरेश शरण शास्त्री महाराज,मातृशक्ती विभाग संयोजिका अनुराधा महाकाळकर,संजय जलताडे,अतुल देशपांडे,गजानन मसाये, अजय भोंग यांनी अभिनंदन केले



