
ता़ प्रतिनिधी आर्वी
नितीन आष्टीकर

दिनांक 28 फेब्रुवारी 2026
वैज्ञानिक प्रगतींतूनच देशाचा खरा उगम… डॉली ठाकूर..

आज संपूर्ण देशभर राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या सन्मानाने संपन्न होत आहे करिता कन्नमवार विद्यालय आर्वी येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा निरनिराळे प्रयोग आणून आपल्या सुप्त गुणांना वाव दिला करिता सदर कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री रेवतकर व पर्यवेक्षक श्री ठाकूर यांनी केले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील गुणवंतांचा व माजी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापकांनी व पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गुजरकर सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व विज्ञान शिक्षक व इतर शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाप्रसंगी डॉली यश ठाकूर यांनी मत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. तर खरा मानवी विकास आणि विश्वातील प्रगतशील देशाचा विकास हा विज्ञाना मुळे होत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी या प्रदर्शनी च्या निमित्ताने विद्यार्थ्यां समोर मांडले
व आज विज्ञान ही काळाची गरज कशी आहे असे पटवून सांगितले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने शाळेतील ज्येष्ठ शिक्षक अजय खंडाई त सर यांनी केले





