HomeUncategorizedशासकीय आय टि आय पुलगाव येथील लाखोंचे जुने भंगार लोखंड, विक्रीचा भ्रष्टाचार...

शासकीय आय टि आय पुलगाव येथील लाखोंचे जुने भंगार लोखंड, विक्रीचा भ्रष्टाचार उघडकीस…!!

शासकीय आय टी आय पुलगाव येथील लाखोंचे जुने भंगार लोखंड विक्रीचा भ्रष्टाचार उघडकीस…!!

प्रतिनिधी वर्धा —

पुलगाव येथील शासकीय आय टी आय मध्ये कार्यरत असलेले प्रिन्सिपॉल संजय कोकुलवार म्हणून कार्यभार पाहत आहे त्या़ंच्या कडे अजूनही चार आय टी आय म्हणजे वर्धा, हिंगणघाट, देवळी, येथील कार्यभार आहे,
मागील एप्रिल महीन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी, लाखो रुपयाचे आय टी आय मधील भंगार लोख़ंड कोणतीही जाहीर निवीदा, न काढता, किव्हा इतर कोणाला ही लिलावाची माहिती न करता, परस्पर भांडारपाल यांच्या मदतीने
लाखो रुपयाचे लोखंडी भंगार कोणत्या ही न्यूज पेपरला त्याची जाहिरात न देता.
परस्पर सायंकाळी 5 वाजता, मोठे दोन हिंदुस्थान क्राप्स चे ट्रक बोलावले जाते, ज्याचे नंबर क्रमांक 1) Mh 04 DR / 2421, 2) Mh 04 Ds 5668 – हे ट्रक आयटी आय मध्ये जाते आणी कित्येक टन लोहा भरून रात्री 11 वाजता ते ट्रक निघून जाताना हे द्रुष्य अनेकानी डोळ्याने बघीतले
सदर भंगार लिलावाची शासकीय पध्दतीने ऑनलाईन पोर्टल वर जाहीर निवीदा काढणे अनिवार्य असून त्याची व्रुत्तपत्रांना जाहिरात देणे सुद्धा गरजेचे होते. ऐन सायंकाळी आय टी आय मधील लोखंड भंगार विकण्याचा प्रताप आय टी आय चे प्रिन्सिपॉल संजय कोकुलवार तसेच त्या़ंचे सहकारी भा़ंडारपाल आनंद सोनटक्के यांनी कुणालाही काही सुचना न कळविता गेल्या कित्येक वर्षापासून चे भंगार लोखंड रातोरात विकले, ज्या ट्रक मध्ये पुलगाव आय टी आय मधून भंगार वाहून नेले ते वर्धा जवळील वायगाव येथे विकल्याची माहिती गुप्त सुत्रांकडून मिळाली: सदर घटने स़ंबधात आमचे प्रतिनिधी यांनी विचारपुस केली असता, आयटीआय मधील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला….!
यावरून लक्षात येतो कि आजपर्यंत कित्येक लाखो रुपयांची लोखंडे व भंगार तसेच जुने काम्पुटर सिपियू, विकले असावे, या संबधित प्रकाराची वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनीधी मा. आमदार *राजेश बकाने साहेब, देवळी *विधानसभा* यांनी दखल घेणे गरजेचे आहे, आजपर्यंत दरवर्षी कित्येक लाख रुपयाची भंगार लोखंडे विकली गेली असेल याचा अंदाज लावने अशक्य आहे, पुलगाव व्यतिरीक्त तसे चारही संबंधित शासकिय आय टी आय ची कसून चौकशी करण्यात यावी. अशी जनमानसात चर्चा आहे.. तसेच भ्रष्टाचारी शिक्षक आणि कर्मचारी यांच्या वर कठोर कार्यवाही करण्यात यावी.. अशी मागणी जोर धरत आहे….!!

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
27.8 ° C
27.8 °
27.8 °
65 %
2kmh
8 %
Fri
38 °
Sat
41 °
Sun
42 °
Mon
44 °
Tue
41 °

Most Popular