
प्रतिनीधी हिंगणघाट
दिनांक 9 फेब्रुवारी 2026
सिंधी रेल्वे प्रखंड विहिप मातृशक्ती संयोजिका पदी सौं अनिता राजेश सॊनटक्के यांची नियुक्ती..
सिंधी रेल्वे येथे झालेल्या विहिप च्या बैठकीत सिंधी रेल्वे प्रखंड मातृशक्ती संयोजिका पदी सौं अनिता राजेश सोनटक्के यांची निवड करण्यात आली. या निवडी वेळी वर्धा जिल्हा विहिप मंत्री शरद कोणप्रतिवार, वर्धा जिल्हा विहिप सहसेवा प्रमुख ओमप्रकाश मस्कर, सिंधी रेल्वे प्रखंड विहिप सहमंत्री राहुल घोडे, हिंगणघाट प्रखंड विहिप धर्मयात्रा संपर्क प्रमुख मारोती सहारे, राजेश सोनटक्के उपस्थित होते.
सौं अनिता राजेश सोनटक्के यांच्या झालेल्या निवडी बद्दल विहिप विदर्भ प्रांत स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे, मातृशक्ती विभाग संयोजिका अनुराधा महाकाळकर, वर्धा जिल्हा विहिप अध्यक्ष सुभाष राठी, वर्धा जिल्हा विहिप उपाध्यक्षा ऍड राखी वैरागडे, उपाध्यक्षा वंदना चाफले, वर्धा जिल्हा विहिप सहमंत्री अरविंद कोकाटे, सहमंत्री संजय पोफळी, वर्धा जिल्हा मातृशक्ती संयोजिका विद्या पेंडके, सह संयोजिका पल्लवी शहागडकर, सिंधी रेल्वे विहिप अध्यक्ष मोहन फुसे, सिंधी रेल्वे प्रखंड मंत्री रितेश पालिवाल, विहिप सहमंत्री दत्ता चव्हाण,सोनाली साखळे यांनी अभिनंदन केले..



