प्रतिनिधी रिझवान शेख
हिंगणघाट

दिनांक 18 जानेवारी 2026

हिंगणघाटमध्ये भव्य हेल्मेट व रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन……
हिंगणघाट शहरात वाढत असलेल्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी आज शुक्रवार, दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी शहरात भव्य हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगणघाट पोलीस स्टेशन व एन.एच.आय.टी. यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली.

या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा यांच्यावतीने मोटर वाहन निरीक्षक मेघल अनासाने, सहायक मोटर वाहन निरीक्षक श्रीकांत येवले, हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल राऊत, पोलीस उपनिरीक्षक आवारी, वाहतूक पोलीस शाखेचे रवि वानखेडे, शिवाजी पाटील, प्रदीप दातारकर तसेच एन.एच.आय.टी.चे अधिकारी प्रशांत हिंगे उपस्थित होते.
रॅलीच्या सुरुवातीला मार्गदर्शन करताना अनासाने यांनी वाहन चालवताना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर अनिवार्य असून वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असे मत व्यक्त केले. रस्ता सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अनासाने, राऊत व हिंगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शासकीय विश्रामगृह, हिंगणघाट येथून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली तुकडोजी पुतळा चौक, कारंजा चौक, मोहता चौक, सुभाष चौक, विठोबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तहसील कार्यालय या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा शासकीय विश्रामगृह येथे समारोपित झाली.
सुमारे 250 नागरिकांनी हेल्मेट परिधान करून दुचाकीसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व शहरवासीयांना दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट वापरण्याचे प्रभावी आवाहन करण्यात आले.
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, हिंगणघाट पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी, एन.एच.आय.टी.चे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व प्रशिक्षक त्यामध्ये माँ शक्ती ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक सुरेंद्र आगरे, माई ड्राइव्हिंग स्कूल चे संचालक विजय तामगाडगे, मेहेर बाबा ड्राइव्हिंग स्कूल चे संचालक किशोर बांगडे, टेम्भूर्णे ड्राइव्हिंग स्कूल चे संचालक राहुल टेम्भूर्णे, घोडे ड्राइव्हिंग स्कूल चे संचालक राजेश घोडे, बालाजी ड्राइव्हिंग स्कूल चे संचालक सुरज वंजारी, श्री बालाजी ड्राइव्हिंग स्कूल चे संचालक शरद बेलखेडे यांनी मोलाचे सहकार्य केले.



